
दोन्ही हातांनी न बघता बनवले छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे स्केच
Amazing Video : या जगात प्रतिभावान कलाकारांची खरचं कमतरता नाही. काही कलाकारांचे अद्भुत टॅलेंट पाहून आपल्याला आश्चर्य वाटते, काही कलाकार आपल्या अनोख्या टॅलेंटने एका क्षणात हजारो लोकांची मने जिंकून घेतो.
नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक शिक्षक आपल्या दोन्ही हातांनी स्केच काढतांना दिसत आहेत. आश्चर्य म्हणजे ते न पाहताही आपल्या दोन्ही हातांनी स्केचेस काढत आहे.
जगात असे अनेक लोक आहेत जे दोन्ही हातांनी काम करू शकतात. पण, दोन्ही हातांनी काही तरी काम करणे आणि दोन्ही हातांनी स्केच काढणे यात फरक आहे.
जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये तुम्ही फक्त त्या शिक्षकाची कला बारकाईने निट पहा. तेव्हा तुम्हाला एक आश्चर्यकारक बाब कळेल ती म्हणजे ते शिक्षक बोर्डवर न पाहता दोन्ही हातांनी स्केचेस तयार करत आहेत.
Hindustan Now Global Press यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हिडिओची सुरुवात ही वर्गखोली पासून होते.
हेही वाचा: ओमने साकारले गुरु-शिष्य चित्र
व्हिडिओची सुरुवात ही वर्गखोली पासून होते. या व्हिडिओत आपण पाहू शकता की शिक्षक ब्लॅकबोर्डच्या समोर खुर्चीवर पाठीमागे बसलेले आहेत. ते फळ्याकडे पाठ करुन बसलेले आहे आणि त्यांचा चेहरा हा कॅमेऱ्याच्या समोरच्या बाजूने आहे. यानंतर पुढे शिक्षक आपले दोन्ही हात ब्लॅकबोर्डवर मागे नेतात. आणि खडूने दोन चेहऱ्यांची रचना रेखाटू लागतात.
आपण पाहू शकता की ते ब्लॅकबोर्डवर सुरुवातीला बाह्यरेखा काढतात. त्यानंतर मग हळूहळू संपूर्ण चित्र आपल्या समोर येते. चित्र समोर आल्यावर मग कळत की शिक्षकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे रेखाटन केल्याचे कळते.
46 सेकंदाचा अद्भुत व्हिडिओ
या 46 सेकंदाच्या व्हिडिओने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून लोक शिक्षकाच्या कला कौशल्याचे कौतुक करत आहेत. मात्र, शिक्षकासमोर आरसा लावण्यात आल्याचा दावाही काही जण करत आहेत. ज्यावर बघून ते स्केचेस बनवत होते असे काही लोक म्हणत आहेत. बहुतेक सोशल मिडिया वापरकर्ते शिक्षकाच्या या अद्वितीय प्रतिभेचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'अद्भुत कलेला सलाम. दुसरीकडे, दुसर्या वापरकर्त्याने लिहिले की, 'अद्भुत, अविश्वसनीय आणि कल्पनाशक्तीसह हातांच्या बोटांचे कौशल्य उत्कृष्ट आहे.'
Web Title: Sketch Of Shivani Maharaj And Maharana Pratap Without Seeing Them
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..