सामाजिक व कौशल्यपूर्ण शिक्षण (डॉ. दीपक शहा)

Pratibha-International-School
Pratibha-International-School

शिक्षकाला बरेचदा मूर्तिकार किंवा मातीला आकार देणारी व्यक्ती असे म्हणतात. तो आपल्याकडील सर्व कौशल्य पणाला लावून मूर्ती घडवत असतो; पण हाडामांसाचे विद्यार्थी घडवताना त्यांचा कल, त्यांना काय करायचे आहे, याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे. विद्यार्थ्यांला काय करायचे आहे, हे त्याला ठरविता यावे, ते शारीरिकदृष्ट्या स्वतंत्र होतानाच.. आपले निर्णय घेण्याचे स्वतंत्र त्या विद्यार्थाला यावे यासाठी प्रतिभा इंटरनॅशनल शाळेची शिक्षणप्रणाली पावलोपावली साहाय्य करत असते.

मुलांना चाकोरीबद्ध शिक्षण न देता चार भिंतींपलीकडील शिक्षणाचे महत्त्व काय आहे, हे पटवून दिले जाते. २००७ मध्ये दीपक शहा यांनी भावी काळातील आधुनिक व दर्जेदार शिक्षणाची गरज ओळखून प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलची मुहूर्तमेढ रोवली. समाजात वावरताना येणाऱ्या आव्हानांपुढे हार न मानता ते समर्थपणे ते पेलण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण व्हावी, असा उद्देशही ही शाळा स्थापनेमागे असावा. प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई पॅटर्नप्रमाणे सर्व अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून ‘केंब्रिज यंग लर्नस इंग्लिश ॲसेसमेंट’ राबविण्यात येते. त्यामुळे मुलांच्या आकलन क्षमतेत भर पडते. यांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना केंब्रिज विद्यापीठाकडून गौरविण्यात येते. 

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून प्रतिभा स्कूलने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चर्चासत्र, कार्यशाळा, परिसंवाद, गटचर्चा, पालक - मुले संवाद, उद्योजक, समाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने,औद्योगिक व सेवा क्षेत्रातील गरज ओळखून त्यावर आधारित उपक्रम व संवाद स्पर्धांचे आयोजन हे या संस्थेची वैशिष्ट्ये आहेत. उत्तमात उत्तम असे इन्फ्रास्ट्रक्‍चर, केंब्रिज निकषांची पूर्तता करणारे अनुभवी शिक्षक, औद्यागिक क्षेत्रातील पदाधिकारी सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने २०१६ मध्ये ‘आदर्श शाळा’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर शिक्षण विभागाच्या वतीने मुख्याध्यापिका सविता ट्रावीस यांना ‘आदर्श शिक्षिका’ म्हणून गौरविण्यात आले.

शिक्षकांमधील कौशल्य विकसनासाठी कार्यशाळा, उजळणी कार्यक्रम राबविण्यात येतात. दर दोन वर्षांनी केंब्रिज ॲसेसमेंटद्वारे शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात येते. 
विद्यार्थ्यांसाठी शाळेत स्केटिंग, स्काउट ॲण्ड गाइड, संगीतामध्ये सिंथेसायझर, तबला शिकण्याची सोय आहे. त्याचप्रमाणे रायफल शूटिंग, नृत्य, नाटक, गायन, जिम्नॅस्टिक्‍स, पोहणे इ. शिकण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाक कला, विणकाम यासारखे अनुभवावर आधारित उपक्रमही राबविण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर व्यवसाय सुरू करायचा आहे, अशांसाठी संबंधित तज्ज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. सैनिकी शिक्षण घेऊनही कसे करिअर करता येते, याविषयी लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी मुलांना शिकवितात. विद्यार्थी दरवर्षी दिव्यांग सैनिक, कॅन्सर फाउंडेशन, सेवा धाम अनाथाश्रम, बालग्राम अनाथाश्रम, सकाळ रिलीफ फंड यासाठी निधी उभारतात. यंदाही विद्यार्थ्यांनी विविध संस्थांना सुमारे एक लाख २२ हजार रुपयांची देणगी दिली. वार्षिक स्नेहसंमेलनात आणि गुणवत्ता शोध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येते. विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत राहावे, यासाठी शाळेत ‘मेरी जिज्ञासा’ हा उपक्रम राबविण्यात येतो.

वर्गापलीकडील शिक्षण
सिंथेसायजर, 
तबला प्रशिक्षण
रायफल शूटिंग ट्रेनिंग
होम सायन्स
स्वतंत्र व्यायामशाळा
स्केटिंग ग्राउंड
योगा प्रशिक्षण
इनोव्हेशन लॅब

मेरी जिज्ञासा - मुळातच मुलांमध्ये अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे कुतूहल असते. या कुतूहलाचे रूपांतर माहितीत व्हावे म्हणून विद्यार्थ्यांचे गट करून वेगवेगळ्या विषयांवर माहीती गोळा करण्यास सांगितली जाते व ती माहिती सर्वांना दिली जाते. त्यामुळे माहितीचे शेअरिंग वाढते. "मेरी जिज्ञासा' या उपक्रमामार्फत विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर माहिती मिळाल्याने त्यांची ज्ञान व आकलन क्षमता वाढीस लागते.

विद्यार्थ्यांना चाकोरीबद्ध शिक्षण न देता अनुभवावर आधारित वास्तव शिक्षण देण्याकडे आमच्या शाळेचा कल आहे. यातूनच प्रतिभासंपन्न भावी पिढी घडण्यास मदत होणार आहे.
- डॉ. दीपक शहा, सचिव, प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com