Soil Testing Laboratory Scheme: राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रमांतर्गत ग्रामस्तरावर मृद चाचणी प्रयोगशाळा (VLS-TL) उभारण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.