मायग्रेशन सर्टिफिकेटबाबत "सीबीएसई'चा मोठा निर्णय ! या वर्षीपासून होत आहेत नवीन बदल

CBSE
CBSE
Updated on

सोलापूर : सीबीएसईने स्थलांतर प्रमाणपत्र (मायग्रेशन सर्टिफिकेट) संबंधित आवश्‍यक माहिती जारी केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) देखील आपल्या वेबसाइट cbse.nic.in वर नोटीस बजावली आहे. स्थलांतर प्रमाणपत्र देण्याबाबतीत बोर्ड काही बदल करणार आहे, जे या वर्षापासून लागू होतील. जाणून घ्या काय बदलणार होणार आहेत ते... 

वास्तविक, सीबीएसईने स्थलांतर संबंधित नवीन प्रणाली तयार केली आहे. यापुढे बोर्ड स्थलांतरणाच्या प्रमाणपत्राची हार्ड कॉपी देणार नाही. सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर प्रमाणपत्र ऑनलाइन डिजिलॉकरवर अपलोड केले जाईल. लॉगइन आयडी आणि पासवर्डद्वारे विद्यार्थी त्यात प्रवेश करू शकतील. तथापि, जर आपल्या हवे असल्यास बोर्डाकडून त्याची हार्ड कॉपी देखील मागू शकता. जाणून घ्या कसे ते... 

बोर्डाने म्हटले आहे की, दहावी-बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्राची हार्ड कॉपी हवी आहे, त्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. जे विद्यार्थी यासाठी विनंती करतील त्यांना फक्त त्यांच्या प्रमाणपत्राची हार्ड कॉपी दिली जाईल. तथापि, 2024 पर्यंत हार्ड कॉपी देण्याची परंपरा पूर्णपणे संपुष्टात येईल. 

स्थलांतरण प्रमाणपत्र महत्त्वाचे का आहे? 
स्थलांतर प्रमाणपत्र (मायग्रेशन सर्टिफिकेट) म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने विशिष्ट बोर्डमधून अभ्यास केला आहे हे प्रमाणित करण्यासाठी एक दस्तऐवज आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी दुसऱ्या बोर्डामध्ये स्थानांतरित केल्यास त्यांना स्थलांतर प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. त्याचबरोबर बारावीनंतर विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना स्थलांतर प्रमाणपत्रही मागितले जाते. 

हे लक्षात घ्यायला हवे, की सीबीएसई आधीपासूनच डिजिलॉकरवर विद्यार्थ्यांची गुणपत्रके आणि पास प्रमाणपत्र प्रदान करीत आहे. आता स्थलांतर प्रमाणपत्र देखील येथे मिळेल. बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर (सीबीएसई बोर्डाचा निकाल) ही प्रमाणपत्रे डिजिलॉकरमध्ये अपलोड केली जातील. 

या वेळी सीबीएसई 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 04 मे 2021 पासून सुरू होत आहेत. दहावीच्या परीक्षा 07 जूनपर्यंत चालतील आणि 12 वी परीक्षा 14 जून 2021 पर्यंत चालतील. 

ठळक... 
सीबीएसई बोर्डाने स्थलांतर प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया बदलली 
अधिकृत वेबसाईटवर नोटीस बजावली आहे 
या वर्षापासून नवीन यंत्रणा राबविण्यात येत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com