एसबीआय भरणार आठ हजार क्‍लार्क पदे ! परीक्षेची पहिली प्रतीक्षा यादी जाहीर; असे करा रिझल्ट थेट डाउनलोड

SBI
SBI

सोलापूर : "एसबीआय'ने (स्टेट बॅंक ऑफ इंडिया) 7 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबर 2020 दरम्यान क्‍लार्कची मुख्य परीक्षा घेतली होती. त्याचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या उमेदवारांनी एसबीआय क्‍लार्क 2020 ची परीक्षा दिली होती, त्यांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवरून एसबीआय क्‍लार्कची पहिली प्रतीक्षा यादी 2020 तपासू शकतात. 

एसबीआय क्‍लार्क फर्स्ट वेटिंग लिस्ट ही 2020 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांची यादी आहे. तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीच्या दिवशी पात्रता कागदपत्रांसह आपला बायोडेटा सादर करावा लागेल. निवड झालेल्या अर्जदारांना ग्राहक साहाय्य आणि विक्रीमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून नेमले जाईल. एसबीआय क्‍लार्क रिझल्ट 2020 डाउनलोड करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. 

7 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबर 2020 दरम्यान घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा एसबीआय क्‍लार्कचा निकाल 2020 जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील विविध शाखांमध्ये आठ हजार पदे भरण्यासाठी एसबीआय क्‍लार्क भरती केली जात आहेत. एकूण 7870 पदे नियमित आहेत आणि 130 पदे विशेष भरती मोहिमेअंतर्गत आहेत. उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की एसबीआय क्‍लार्क रिझल्ट 2020 तात्पुरता आहे आणि स्थानिक भाषेत पात्रता कौशल्य चाचणीच्या अधीन आहे. नोंदणीच्या वेळी उमेदवारांनी सादर केलेली माहिती या पदासाठी निवडणे योग्य असली पाहिजे. 

असा करा रिझल्ट डाउनलोड 
उमेदवाराचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर येणाऱ्या Career सेक्‍शनला जा. तेथे आपणास Recruitment of Junior Associates - Customer Support and Sales. Provisionally selected candidate's waiting list' ही लिंक मिळेल. यावर क्‍लिक केल्यास तुमच्या समोर एक पीडीएफ फाइल उघडेल. यातच तुमचा निकाल आहे. 
आता आपण आपला निकाल तपासू शकता आणि डाउनलोड करू शकता आणि त्यातून प्रिंट आउट देखील घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com