esakal | एप्रिलमध्ये होणारी एनटीए एआरपीआयटी परीक्षा स्थगित ! जाणून घ्या तपशील
sakal

बोलून बातमी शोधा

Arpit Exam

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अलीकडेच ऍनुअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग (एआरपीआयटी) परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (ऍडमिट कार्ड) जारी केले आहे. उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. मात्र, 10 एप्रिल रोजी होणारी ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर. 

एप्रिलमध्ये होणारी एनटीए एआरपीआयटी परीक्षा स्थगित ! जाणून घ्या तपशील

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अलीकडेच ऍनुअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग (एआरपीआयटी) परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (ऍडमिट कार्ड) जारी केले आहे. उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. मात्र, 10 एप्रिल रोजी होणारी ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर... 

पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमुळे आयोगाने एआरपीआयटी परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 10 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती, जी काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. पुढील परीक्षेची तारीख लवकरच आयोगाकडून कळविली जाईल. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी एनटीएच्या nta.ac.in, arpit.nta.nic.in या अधिकृत आणि इतर वेबसाइटवर भेट द्यावी. 

एआरपीआयटी 2020 ची परीक्षा सकाळी आणि दुपारी या दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. सकाळची शिफ्ट दुपारी 9 ते 12 आणि दुपारची शिफ्ट 3 ते 6 या वेळेत असेल. ही संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) परीक्षा असेल. 100 प्रश्नांसाठी 3 तासांची वेळ दिली जाईल. परीक्षेत कोणतेही निगेटिव्ह मार्किंगचे नियम नाहीत.

loading image