पंजाब नॅशनल बॅंकेत सफाई कामगार भरती ! अशिक्षित देखील करू शकतात अर्ज

punjab national bank
punjab national bank

सोलापूर : पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) विविध मंडळांमध्ये सफाई कामगार भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. बॅंकेच्या विविध मंडळांनी जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार एकूण 58 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अशिक्षितही अर्ज करू शकतात. जाणून घ्या याबाबत सविस्तर. 

सफाई कामगार भरतीची जाहिराती देणाऱ्या पीएनबी बोर्डात गुरुग्राम (हरियाणा) आणि तिरुअनंतपुरम (केरळ) यांचा समावेश आहे. या मंडळांमध्ये असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखांमध्ये अधीनस्थ संवर्गात सफाई कामगारांची भरती करण्यात येणार आहे. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार विहित नमुन्यात अर्ज सादर करू शकतात. गुरुग्राम मंडळासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल आहे आणि तिरुअनंतपुरमसाठी 17 एप्रिल 2021 आहे. 

पंजाब नॅशनल बॅंक : गुरुग्राम सफाई कर्मचारी भरती जाहिरात आणि अर्ज फॉर्म डाउनलोड लिंक 

कोण अर्ज करू शकेल? 
केवळ तेच उमेदवार जे दहावी पास नाहीत आणि ज्यांच्याकडे किमान शैक्षणिक पात्रता नाही, ते पंजाब नॅशनल बॅंक सफाई कर्मचारी भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. म्हणजेच असे उमेदवार अशिक्षित, पण दहावी पास नसलेले अर्जही करू शकतात. याव्यतिरिक्त, 1 जानेवारी 2021 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, विविध श्रेणीतील उमेदवारांच्या जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याचीही तरतूद आहे, ज्यात जास्तीत जास्त 15 वर्षे असू शकते. अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पाहा.  

अर्ज कसा करावा? 
अर्जासाठी उमेदवार पीएनबीच्या संबंधित मंडळाच्या कार्यालयातून अर्ज मिळवू शकतात किंवा वरील थेट लिंकवर जाहिरात व अर्ज डाउनलोड करू शकतात. आपण भरलेल्या अर्जाचा फॉर्म आपल्या प्रमाणपत्राची स्वत:ची साक्षांकित छायाप्रतीसह पीएनबीच्या संबंधित विभागीय कार्यालयात अंतिम तारखेपर्यंत सादर करू शकता. अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पाहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com