esakal | आपल्या पहिल्या कमाईपासूनच करा बचत व गुंतवणुकीला सुरवात ! "या' आहेत महत्त्वाच्या टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

Saving

सध्याची पिढी सुशिक्षित जरी असली तरी त्यांच्यात आर्थिक साक्षरता दिसत नाही. मात्र हे लक्षात ठेवावे लागेल की भविष्यासाठी आर्थिक तरतूदही महत्त्वाची आहे. त्यासाठी पहिल्या कमाईपासून बचत आणि गुंतवणुकीला सुरवात करायला हवी. बचत आणि गुंतवणुकीच्या या आहेत महत्त्वाच्या टिप्स... 

आपल्या पहिल्या कमाईपासूनच करा बचत व गुंतवणुकीला सुरवात ! "या' आहेत महत्त्वाच्या टिप्स

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : आजच्या पिढीतील युवकांसाठी महागडे गॅझेट्‌स, लक्‍झरी हॉलिडेज आणि करमणुकीसाठी शाही खर्च करणे सामान्य आहे. परंतु जोपर्यंत आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीचा प्रश्न आहे, त्यात ही पिढी खूप मागे दिसते. ही पिढी सुशिक्षित जरी असली तरी त्यांच्यात आर्थिक साक्षरता दिसत नाही. मात्र हे लक्षात ठेवावे लागेल की भविष्यासाठी आर्थिक तरतूदही महत्त्वाची आहे. त्यासाठी पहिल्या कमाईपासून बचत आणि गुंतवणुकीला सुरवात करायला हवी. बचत आणि गुंतवणुकीच्या या आहेत महत्त्वाच्या टिप्स... 

खर्चाचा अचूक हिशेब ठेवा 
तरुण पिढीतील बरेच लोक जेव्हा त्यांच्या कमाईचे सुवर्ण दिवस असतात तेव्हा खर्चाचा हिशेब ठेवत नाहीत. परंतु खर्चाचा हिशेब ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्या खर्चाचा मागोवा घेत आपण अंदाज लावू शकता की आपण आपली आर्थिक संसाधने कोठे खर्च करीत आहात आणि आपण कमी कुठे पडत आहोत. हे आपल्याला आर्थिक नियोजनात मदत करेल. 

जीवन आणि आरोग्य विमा आवश्‍यक 
कोणत्याही व्यक्तीसाठी जीवन आणि आरोग्य विमा आवश्‍यक आहे. आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी जीवन विमा आवश्‍यक आहे. त्याच वेळी आपल्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आरोग्य विमाही आवश्‍यक आहे. जरी आपल्याला ऑफिसमधून वैद्यकीय विमा संरक्षण मिळत असेल, परंतु आरोग्य विमा पॉलिसी स्वत:ला अतिरिक्त कव्हर म्हणून विकत घ्या; कारण उपचारांचा खर्च आता वाढत आहे. 

पीपीएफ आणि व्हीपीएफ 
भविष्यातील आर्थिक सुरक्षा नव्या पिढीला तितकीच महत्त्वाची आहे जितकी जुन्या पिढीसाठी होती. त्यासाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक सुरू करा. दीर्घ कालावधीत मालमत्ता निर्मितीसाठी हे एक उत्तम साधन आहे. या गुंतवणुकीवर कोणताही कर लावला जात नाही आणि दीर्घकाळ तुमच्याकडे चांगला निधी जमा होईल. त्याचबरोबर व्हीपीएफमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक कर दायित्वाशिवाय केली जाऊ शकते. 

एनपीएसमध्ये गुंतवा पैसे 
निवृत्तीनंतर चांगला निधी जमा होण्यासाठी एनपीएस एक चांगले गुंतवणूक माध्यम आहे. हे आर्थिक सुरक्षा प्रदान करते. वयाच्या 60व्या नंतर म्हणजेच सेवानिवृत्तीनंतर आपण त्यातील काही भाग काढून घेऊ शकता आणि दरमहा एक निश्‍चित रक्कम मिळवता येते. एनपीएसच्या माध्यमातून तुम्ही शेअर्स आणि डेट यांसारख्या फायनान्सिअल मार्केटमध्येही गुंतवणूक करू शकता आणि मोठ्या रिटर्न्सचा फायदा घेऊ शकता. 

म्युच्युअल फंडात गुंतवणूक योग्य आहे 
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे, विशेषत: एसआयपीद्वारे हे तुम्हाला एक शिस्तबद्ध गुंतवणूकदार बनवते. एसआयपीच्या माध्यमातून मोठा निधी दीर्घकाळ तयार होतो, जेणेकरून आपल्याला भविष्यातील खर्चाबद्दल खात्री असेल.

loading image