इन्फ्रास्ट्रक्‍चर आणि रिअल इस्टेट क्षेत्रात बनवा करिअर ! आहेत रोजगाराच्या अनेक संधी

Real Estate
Real Estate

सोलापूर : गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्राला वेग आला आहे. इन्फ्रास्ट्रक्‍चर आणि रिअल इस्टेटमुळे देशाचा चेहरामोहरा बदलला आहे. आपणास हे माहीत आहे का, की हे क्षेत्र कोट्यवधी लोकांना रोजगार देखील देते. तर तुम्हालाही रिअल इस्टेटमध्ये करिअर करायचं असेल जाणून घ्या ही संपूर्ण माहिती... 

इन्फ्रास्ट्रक्‍चर आणि रिअल इस्टेट हे असे क्षेत्र आहे जेथे नोकरीच्या अधिक संधी आहेत. या क्षेत्रातील नोकरीबरोबरच तुम्हाला चांगले पैसे आणि परदेशात फिरण्याची संधी देखील मिळते. परंतु या फायद्यांसह या क्षेत्रात आव्हानेही खूप आहेत. बरेच तास काम करणे, लोकांशी व्यवहार करणे, उत्तम संवाद कौशल्य हे या क्षेत्राची मागणी आहे. 

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व गुणवत्ता आपल्यात असावी. आपण आपले स्वतःचे कार्य सुरू करू इच्छित असाल तर आपल्याला सतत लोकांशी आपली ओळख वाढवावी लागेल. हे आपल्याला भविष्यात आपला व्यवसाय वाढविण्यात मदत करेल. इन्फ्रास्ट्रक्‍चर इंडस्ट्री विशेषत: दोन गोष्टींवर अवलंबून आहे - कोळसा खाणी आणि डांबर कारखान्यांमधून कच्चा माल घेऊन रस्ता बांधकाम, सिमेंट, वाळू, विटा घेऊन विविध प्रोजेक्‍ट तयार करण्यासाठी खर्च करणे. या दोन्ही व्यवसायांमध्ये फ्लॅट, मोठे पूल, कमर्शिअल स्पेस मोठ्या किमतीने विकून पैसे मिळवता येतो. तथापि, यासाठी आपल्याकडे उच्च श्रेणीचे विक्री कौशल्य असणे आवश्‍यक आहे. 

करिअर कसे करावे? 
या क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी तुम्हाला सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्‍शन इंजिनिअरिंगची डिग्री घ्यावी लागेल. देशातील बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालये सिव्हिलमध्ये बीटेकचा पर्याय देतात. आपण जेईई किंवा जेईई-ऍडव्हान्स परीक्षा पास करून अव्वल आयआयटी महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकता. याशिवाय काही राज्यस्तरीय आणि महाविद्यालयांची प्रवेश परीक्षा पास करून बीटेकमध्ये प्रवेश घेऊ शकता. आपण दहावी आणि बारावीनंतर सिव्हिलमधून पॉलिटेक्‍निकमध्ये डिप्लोमा देखील करू शकता. याशिवाय तुम्हाला कोर्सशिवाय रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या संपर्कातून मार्केटमधून कच्चा माल आणि मजूर घ्यावे लागतील. आपल्या व्यवसायासाठी बॅंका कर्ज देखील देऊ शकतात. 

तांत्रिक नोकऱ्यांव्यतिरिक्त या क्षेत्रात तुम्ही सेल्स, मार्केटिंग किंवा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये एमबीए करून किंवा बिझिनेस कम्युनिकेशन्सची पदवी मिळवून एखाद्या बांधकाम कंपनीकडून आपल्या करिअरची सुरवात करू शकता. नोकरीवर अवलंबून सेल्स मॅनेजर, सेल्स एक्‍झिक्‍युटिव्ह, कन्स्ट्रक्‍शन एक्‍झिक्‍युटिव्ह अशा पोस्ट्‌सद्वारे आपण आपली कारकीर्द सुरू करू शकता. 

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी या विशेष गोष्टींबद्दल आपल्याला माहीत असले पाहिजे 

  • इमारत आणि बांधकाम संबंधित तांत्रिक बाबी 
  • विविध क्षेत्रांतील घरे / भूखंड / जमिनींशी संबंधित बाजारभाव आणि माहिती 
  • वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक व शेअर्सवर लक्ष ठेवणे 
  • ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मार्केटिंग, विक्री आणि किंमतीची रणनीती तयार करणे 
  • शेअर्स होल्डर्स आणि खरेदीदारांचे मोठे नेटवर्क जाणून घेणे 

नोकरी आणि पगार 
या क्षेत्रात पदवी मिळविल्यानंतर आपल्याकडे सरकारी आणि खासगी अशा दोन्ही नोकऱ्यांचा पर्याय आहे. परंतु या क्षेत्रात खासगी नोकऱ्या अधिक आहेत. रिअल इस्टेट सेल्स एक्‍झिक्‍युटिव्हसाठी प्रारंभिक पगार 15 हजार ते 50 हजारांपर्यंत असू शकतो. व्यवसाय आणण्याच्या आधारे पगारामध्ये आणखी वाढ होऊ शकते. जर आपण कमिशन आधारावर बॅंक किंवा खासगी फायनान्स कंपनीच्या रिअल्टी किंवा तारण विभागात काम केले तर आपल्याला बिझनेस रिलेशन बनण्याच्या प्रमाणात अधिक पगार मिळू शकेल. जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअर असाल तर तुम्हाला किमान 20 ते 25 हजार पगार मिळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com