- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
माणूस माझे नाव, माणूस माझे नाव दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव
- बाबा आमटे
संपूर्ण कविता शोधून वारंवार वाचण्यासारखी आहे. नुकतेच दहावी व बारावीचे निकाल लागलेले आहेत. अशा वेळी योग्य तो निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर अनेक पाल्य आणि त्यांच्यासाठी त्यांचे पालक उभे आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या आयुष्याचे नेमके काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रेरित व्हायचे असल्यास ही रचना पूर्णपणे वाचायलाच हवी.