Government Job | 'स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया'मध्ये भरती; पगार १ लाखापर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Government Job

Government Job : 'स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया'मध्ये भरती; पगार १ लाखापर्यंत

मुंबई : भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) ने ग्रुप यंग प्रोफेशनल आणि कनिष्ठ सल्लागार पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार saijobs.sportsauthorityofindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

या भरतीद्वारे 6 पदे भरली जातील. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२२ आहे. (Sports Authority Of India Recruitment 2022) हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे- 6

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 21 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2022

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी विविध शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे.

वय मर्यादा

यंग प्रोफेशनल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे, तर कनिष्ठ सल्लागार पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

निवडलेल्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून त्यांची मुलाखत घेतली जाईल.

पगार

कनिष्ठ सल्लागार पदांसाठी निवड झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांना रु. 75,000 ते रु. 1,00,000 पगार दिले जातील, तर यंग प्रोफेशनल पदांवर भरतीसाठी यशस्वी उमेदवारांना रु. 40,000 ते 60,000 पगार दिले जातील.

टॅग्स :Government Jobs