

SPPU Degree Certificate Verification Online
sakal
SPPU Degree Certificate Verification Now Online: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाआधीच आता विद्यार्थ्यांना आपल्या पदवी प्रमाणपत्राची ऑनलाइन पडताळणी करता येणार आहे. प्रमाणपत्रावर नाव किंवा इतर तपशिलात काही चूक असल्यास, ती वेळीच दुरुस्त करण्याची सोय विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता घरपोच 'बिनचूक' पदवी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, दुरुस्तीसाठी विद्यापीठात मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत.