एसएससी (कर्मचारी चयन आयोग) ने १८ जानेवारी २०२४ रोजी होणारी सीजीएल परीक्षा टायपिंग टेस्ट रद्द केली आहे. .या टेस्टच्या दरम्यान तांत्रिक समस्या उद्भवल्या होत्या, ज्यामुळे आयोगाने ती टेस्ट रद्द केली. नवीन तारीख जाहीर केली असून, आता ही टायपिंग टेस्ट ३१ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजता घेतली जाईल..NALCO Vacancy 2025: नॅशनल अल्युमिनियम कंपनीमध्ये 500 हून अधिक रिक्त पदांवर भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती.नवीन तारीख जाहीर करण्यात आली असून, टायपिंग टेस्टसाठी २७ जानेवारी २०२५ रोजी नवीन एडमिट कार्ड जारी केले जाईल. सीजीएल टायपिंग टेस्टला डेटा एंट्री स्पीड टेस्ट (डीईएसटी) म्हणून ओळखले जाते. .ही टेस्ट क्वालिफायिंग आहे, म्हणजेच फक्त पास होणे आवश्यक आहे. उमेदवारांना १५ मिनिटांची वेळ दिला जातो आणि टेस्ट केवळ एसएससीच्या अधिकृत केंद्रांवरच केली जाऊ शकते..सीजीएल परीक्षा किती टप्प्यांमध्ये घेतली जाते?एसएससी सीजीएल परीक्षा चार टप्प्यांमध्ये आयोजित केली जाते. पहिला टप्पा म्हणजे टियर 1 परीक्षा, ज्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना टियर 2 परीक्षा दिली जाते. टियर 2 देखील उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना टायपिंग टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिले जाते. मात्र, सर्व पदांसाठी टायपिंग टेस्ट आवश्यक नाही. या सर्व प्रक्रियांचा समावेश झाल्यानंतर उमेदवारांच्या प्रदर्शनावर आधारित मंत्रालय आणि सरकारी विभागात त्यांची नियुक्ती केली जाते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.