esakal | HSC, SSC Exam : फॉर्म नंबर १७ भरण्यास २७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

hsc ssc board

HSC, SSC Exam : फॉर्म नंबर १७ भरण्यास २७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (राज्य मंडळ) २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी १७ नंबरचा फॉर्म भरून खासगीरीत्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नंबर १७) ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नियमित शुल्काने भरण्यासाठी २७ ऑक्टोबरपर्यंत राज्य मंडळाने मुदतवाढ दिली आहे.

हेही वाचा: Power Crisis: "भाजपला सरकार चालवता येत नाहीए"; सिसोदियांचा प्रहार

राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी १३ ते २७ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. तर विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती आणि मूळ कागदपत्रे अर्जावर दिलेल्या संपर्क केंद्र शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी १४ ते २८ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. तर संपर्क केंद्र शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत मूळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी २ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.

शाळा सोडल्याचा दिनांक व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राह्य धरण्यात यावा, असेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावी आणि बारावीचा २०२१मधील निकाल जुलै-ऑगस्टमध्ये जाहीर झाल्याने खासगी विद्यार्थी ऑनलाइन नाव नोंदणीबाबत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या दाखल्यावरील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सोडल्याची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ अशी ग्राह्य धरण्यात यावी. हा बदल कोरोनामुळे फक्त २०२२ च्या परीक्षेपुरताच लागू राहील. तसेच पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेचा अर्ज मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

हेही वाचा: Dream 11 अ‍ॅप गोत्यात, गुन्हा दाखल; जाणून घ्या काय घडलं?

विद्यार्थ्यांसाठी सूचना :

  • खासगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचा आहे.

  • कोणत्याही विद्यार्थ्यांचा ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही.

  • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने अधिकृतरीत्या दिलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा.

  • कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर, मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत

  • मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य

  • संपूर्ण अर्ज करून झाल्यावर अर्जाची प्रत विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात दिलेल्या ई-मेलवर पाठविण्यात येईल

अर्ज भरण्यासाठी लिंक :

loading image
go to top