
पुणे - इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात, म्हणून परीक्षा केंद्र असणाऱ्या सरसकट सर्वच शाळांमधील केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती त्या केंद्राव्यतीरिक्त अन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याचा निर्णयात अखेर राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाने बदल केला आहे.