हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेडमध्ये स्टाफ नर्स पदांची भरती!

हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेडमध्ये स्टाफ नर्स पदांची भरती! जाणून घ्या पात्रता
HAL
HALesakal
Summary

हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेडमार्फत स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट आणि ड्रेसर या पदांवर भरती केली जाणार आहे.

सोलापूर : हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited - HAL) ने विविध पदांसाठी अर्ज (Jobs) मागवले आहेत. त्याअंतर्गत स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट आणि ड्रेसर या पदांवर भरती (Recruitment) केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट hal-india.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी, कारण फॉर्ममध्ये काहीएक विसंगती आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.

HAL
वडिलांच्या राज्यमंत्रिपदाचा डामडौल न करता निर्माण केली स्वत:ची ओळख!

या तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 24 नोव्हेंबर 2021 सुरू

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2021

रिक्त जागांचा तपशील

  • स्टाफ नर्स : 07

  • मानसोपचारतज्ज्ञ : 01

  • फार्मासिस्ट : 01

  • ड्रेसर : 01

शैक्षणिक पात्रता

स्टाफ नर्सच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (3 वर्षे) डिप्लोमासह PUC असणे आवश्‍यक आहे. तर सायकोथेरपिस्टच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे फिजिओथेरपीमध्ये डिप्लोमा (2 वर्षे) यासह PUC (PCB) असणे आवश्‍यक आहे.

असे असेल अर्जाचे शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या UR/OBC उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल. SC / ST / PWD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. त्याच वेळी, या पोस्टशी संबंधित वयाशी संबंधित माहिती तपासण्यासाठी, उमेदवार अधिकृत पोर्टलवर देण्यात आलेली अधिसूचना तपासू शकतात.

HAL
लग्नसराईत स्वस्त सोने खरेदीची संधी! व्याजही देणार सरकार

अशी होईल निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेवर आधारित असेल. तर, या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com