
रिना भुतडा
विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
चला तर मग नवीन वर्षाची सुरुवात आपण शिक्षण, करिअर व प्रवेश प्रक्रियाविषयक लेखमालेतून सुरू करूयात. शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षा’ एक महत्त्वपूर्ण मैलाचा टप्पा असतो, जो केवळ शैक्षणिक यशच नव्हे तर भविष्यातील अभ्यास आणि करिअर निवडीचा पायादेखील निर्धारित करतो. चांगले परिणाम मिळविण्यासाठी तयारी महत्त्वाची आहे.
स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करा
प्रत्येक विषयासाठी विशिष्ट उद्दिष्टे निश्चित करणे महत्त्वाचे. ते धड्यांचे, उपलब्ध वेळेचे, गुणांचे असू शकते.