esakal | JEE मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, 18 जण पहिल्या क्रमांकावर
sakal

बोलून बातमी शोधा

JEE मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, 18 जण पहिल्या क्रमांकावर

JEE मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, 18 जण पहिल्या क्रमांकावर

sakal_logo
By
नामदेव कुंभार

JEE Main Session 4 Result : 18 जणांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

JEE Main Result 2021: नॅशनल टेस्टींग एजन्सीची जॉईंट एट्रन्स एक्झाम अर्थात जेईई मेन्स 2021 सेशन 4 चा निकाल जाहीर झाला आहे. 18 विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या अव्वल क्रमांक पटकावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. अथर्व अभिजीत तंबत हा महाराष्ट्रातील विद्यार्थी देशात पहिला आला आहे. तर 44 विद्यार्थांना 100 टक्के गुण मिळाले आहे. विद्यार्थी आपला निकाल jeemain.nta.nic.in. या संकेतस्थळावर पाहू शकतात. निकालासोबतच विद्यार्थ्यांना answer key वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.

एनटीएनं 26, 27, 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी जेईई मेन परीक्षा चौथ्या सत्राची परीक्षा आयोजित केली होती. सुमारे 7.8 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं दिली. NTA ने भारतातील 334 शहरे आणि 600 पेक्षा जास्त केंद्रांवर JEE मुख्य परीक्षा घेतली होती. जेईई मेन निकालामुळे जेईई मेन qualifying cutoff स्पष्ट होईल. जेईई मेन परीक्षा विविध टप्प्यामध्ये घेण्यात आली होती. जेईई मेन परीक्षेतील रँक NITs, IIITs आणि CFTI मधील प्रवेशासाठी आणि इतर इंजिनियर कॉलेजच्या प्रवेशासाठी वापरला जाईल.

असा पहा जेईई मेनचा निकाल

स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट nta.ac.in, jeemain.nta.nic.in वर भेट द्या.

स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा.

स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या

loading image
go to top