मानसवेध : ताणाचे व्यवस्थापन

तणावाचे खरे स्रोत ओळखून, स्वभावातील दोषांवर काम केल्यासच ताणाचे मुळासकट व्यवस्थापन शक्य; स्पर्धात्मक युगात वेळेचे नियोजन, भावनांचा निचरा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांना विशेष महत्त्व
Stress Management

Stress Management

Sakal

Updated on

डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

ताणतणावाचे खरे स्रोत शोधून तणावाचं व्यवस्थापन करणं महत्त्वाचे असते. अनेकदा ताण का येतो याची खरी कारणं आपल्या लक्षात येत नाहीत किंवा कळत नकळत आपण खऱ्या कारणांकडे दुर्लक्षही करतो. उदा. आपण म्हणतो मला डेड लाइन्स पाळण्याचा ताण येतो. डेड लाइन्स पाळायच्या असतात ही गोष्ट खरी, परंतु ताण आपल्याला त्यामुळे नसतो, तर आपल्या स्वभावातील काही दोषांमुळे असतो, उदा. काम पुढे ढकलण्याची सवय, कामातील शिस्तीचा अभाव, स्वतःच्या कामावर शंभर टक्के लक्ष केंद्रित न करू शकणे वगैरे. उपाय आपल्याला खऱ्या कारणांवर करायला हवा. तरच मुळासकट ताण नाहीसा होऊ शकेल. स्पर्धेच्या युगात डेड लाइन्स असणारच. उलट कामाचं, वेळेचं सुयोग्य व्यवस्थापन करून, आपण त्या डेड लाइन्स पूर्ण करण्याच्या प्रक्रियेचा आनंद घ्यायला हवा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com