विद्यार्थिकेंद्रित शिक्षण (जगन्नाथ काटे)

जगन्नाथ काटे
Wednesday, 18 December 2019

पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलची ठळक वैशिष्ट्ये

  • पिंपरी-चिंचवड परिसरातील नामांकित शाळा
  • नवी दिल्ली येथील सीबीएसई बोर्डाशी संलग्न
  • महापालिकेच्या वतीने ‘आदर्श शाळा’ या पुरस्काराने सन्मानित
  • उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन कौशल्य असलेले पात्रताधारक, अनुभवी कर्मचारीवर्ग
  • विद्यािर्थकेंिद्रत शिक्षण
  • मोठी इमारत आणि खेळाच्या मैदानाची सुविधा
  • प्रशस्त आणि खेळती हवा असलेल्या वर्गखोल्या
  • प्रत्येक वर्गात ३० विद्यार्थ्यांची क्षमता
  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
  • सुसज्ज विज्ञान, गणित आणि संगणक प्रयोगशाळा

उद्याची पिढी घडविणे हे शाळेचे ब्रीदवाक्‍य असून त्याप्रमाणे विविध अभ्यासक्रम, शालाबाह्य कार्यशाळा व स्पोर्टस्‌च्या माध्यमातून एक आदर्श पिढी घडविण्यासाठी शाळानेहमीच प्रयत्नशील असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शाळा हे विद्यार्थी घडविण्याचे एक उत्तम माध्यम आहे. प्रत्येकालाच आपली शाळा अत्यंत प्रिय असते. मुलांच्या ज्ञान व कौशल्यांना खऱ्या अर्थाने विकसित करण्याचे काम एक आदर्श शाळा करते. एक सजग भावी पिढी घडविण्याचे काम पी.के. इंटरनॅशनल स्कूल सातत्याने करत आलेली आहे. बालशिक्षण घेतानाच विद्यार्थी अनुभवातून घडत असतात. म्हणूनच शिशुवर्गापासूनच शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम ठेवण्याकडे शाळेचा कल आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, आनंददायी व मैत्रिपूर्ण शिक्षणाला पोषक वातावरणनिर्मिती शाळेत असल्याने मुलांना शाळा ही आनंददायी वाटते. पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थिकेंद्रित शिक्षणावर 
भर दिला जात असल्याने प्रत्येक मुलाला त्याच्या अंगभूत गुणांच्या आधारे शिक्षण दिले जाते. 

‘अभ्यास एके अभ्यास’ यावर भर न देता, आकलन क्षमता व विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या कला गुणांना वाव दिला जातो. ‘उद्याची भावी पिढी घडविणे’ हे शाळेचे ब्रीदवाक्‍य असून, त्याप्रमाणे विविध अभ्यासक्रम, शालाबाह्य कार्यशाळा व स्पोर्टस्‌ च्या माध्यमातून एक आदर्श पिढी घडविण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते. शाळेमध्ये असलेल्या ‘‘स्ट्रेस फ्री’’ वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळते व विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळते. अनुभवी शिक्षकवर्ग व विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचे विशेष व्याख्यान यांमुळे मुलांची विचार व आकलनक्षमता वाढण्यास मदत होते. आधुनिक व डिजिटल शिक्षण पद्धती बरोबरच खेळ, गायन, वादन, वाचन यांसारख्या पारंपरिक पद्धतींचाही अभ्यासक्रमात समावेश आहे. 

बुद्धिमान पिढी घडविण्याबरोबरच कलागुणसंपन्न आदर्श व मूल्ये जपणारी पिढी तयार व्हायला हवी, असे शाळेचे ध्येय आहे. विद्यार्थी जे जगतात ते विद्यार्थी करू शकतात. जर विद्यार्थी प्रोत्साहनाने जगत असेल तर त्याला आयुष्यात ध्येय असायला हवे. जर तो समानता आणि प्रामाणिकपणे जगत असेल तर तो न्याय आणि सत्याचे महत्त्व शिकतो. ‘आम्ही हे करू शकतो’, हा विश्‍वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न शाळेतून केला जातो. 

खेळातून प्रगती
विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी फुटबॉल, बास्केट बॉल, बॅडमिंटन, ॲथलेटिक्‍स, खो-खो, कबड्डी, हॅण्डबॉल, क्रिकेट यांसाख्या खेळांचे प्रशिक्षण 

साहित्यावर भर
वादविवाद, प्रश्‍नमंजूषा, पाठांतर, निबंध लेखन, हस्ताक्षर स्पर्धा यासारखे उपक्रम  

जीवन कौशल्ये
विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास व्हावा यासाठी नाटक, वैयक्तिक स्वच्छता कथाकथन माध्यमातून सुप्त गुणांना वाव दिला जातो. 

सामाजिक आणि सांस्कृतिक
विद्यार्थ्यांमधील सामाजिक आणि सांस्कृतिक गुणांचा विकास व्हावा, यासाठी नृत्य, नाटक, विविध प्रदर्शन, विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका यांसारखे उपक्रम राबविण्यात येतात. 

सामाजिक बांधिलकी 
विद्यार्थ्यांमधील सामाजिक जाणिवांचा विकास व्हावा, यासाठी सामाजिक स्वच्छता अभियान, वृक्षलागवडीबाबत जागरूकता यासारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

विद्यार्थिकेंद्रित शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्याने प्रत्येक मुलाला त्याच्या अंगभूत गुणांच्या आधारे शिक्षण दिले जाते. ‘अभ्यास एके अभ्यास’ यावर भर न देता, आकलन क्षमता व विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.
- जगन्नाथ काटे, अध्यक्ष, पी. के.  इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student centered learning jagannath kate