

Student Entrepreneurship
sakal
अद्वैत कुर्लेकर - स्टार्टअप मेन्टॉर
‘मोठं स्वप्न पाहण्यासाठी नेहमीच मोठं भांडवल लागतं असं नाही. खरं तर लहान सुरवात हीच मोठ्या यशाची पहिली पायरी असते.’ विद्यार्थी उद्योजकतेत सर्वांत मोठा गैरसमज म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रचंड पैसा, मोठं ऑफिस आणि मोठी टीम लागते. परंतु वास्तव वेगळं आहे. जगातील अनेक यशस्वी उद्योजकांनी आपली वाटचाल अगदी साध्या, लहान उपक्रमातून सुरू केली. जगातील सर्वांत मोठ्या आणि यशस्वी कंपन्या आणि उद्योग हे घरातील आउट हाउसमध्ये सुरू झाली होती. (उदाहरण ॲपल, मायक्रोसॉफ्ट, एच.पी., गूगल, इत्यादी