- अद्वैत कुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स
केवळ पदवी मिळवून सुरक्षित नोकरीच्या मागे धावणे ही संकल्पना आता हळूहळू मागे पडत आहे. युवा पिढीमध्ये, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची, काही तरी नवीन निर्माण करण्याची आणि समाजासाठी उपयुक्त ठरेल असे काम करण्याची प्रचंड ऊर्मी दिसून येत आहे. शिक्षण घेत असतानाच उद्योजकतेच्या दृष्टीने पाऊल टाकणे ही रोमांचक आणि तितकीच आव्हानात्मक बाब आहे.