HSC Exam : बारावीची पुरवणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार का न्याय...!

इयत्ता बारावीत ७० टक्के गुण असणाऱ्या तन्मय (नाव बदलले आहे) केवळ एका विषयात अनुत्तीर्ण आहे. म्हणून त्याने बारावीची जुलै-ऑगस्टमध्ये झालेली पुरवणी परीक्षा दिली.
hsc exam
hsc examSakal

पुणे - इयत्ता बारावीत ७० टक्के गुण असणाऱ्या तन्मय (नाव बदलले आहे) केवळ एका विषयात अनुत्तीर्ण आहे. म्हणून त्याने बारावीची जुलै-ऑगस्टमध्ये झालेली पुरवणी परीक्षा दिली. एवढंच नव्हे तर विधी अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या सीईटीमध्येही तो पात्र ठरला आहे.

खरंतर तो बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत होता. परंतु आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याने तो हताश झाला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत सात लाख ६७ हजार ३८६ नियमित विद्यार्थ्यांनी, तर ३५ हजार ५८३ पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.

त्यातील ८३ हजार २६८ नियमित, तर १९ हजार ८०८ पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. जवळपास या सर्व विद्यार्थी गृहित धरले, तर तन्मयप्रमाणे जवळपास ९९ हजार ४३ विद्यार्थ्यांनी बारावीची पुरवणी परीक्षा दिल्याचे अंदाज आहे.

राज्यात दहावी-बारावीच्या मुख्य परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०१४ पर्यंत ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्यात येत होती. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना मानसिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने २०१५पासून जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यास सुरवात केली.

पुरवणी परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा सरकारला विसर

पुरवणी परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच शैक्षणिक वर्षात पुढील प्रवेश देऊन शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे, हा  पुरवणी परीक्षेचा ‘जुलै-ऑगस्ट’मध्येच घेण्यामागील मुख्य उद्देश.

दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश फेरीत शेवटच्या टप्प्यात सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेशाची संधी उपलब्ध होते.

परंतु, बारावीची पुरवणी परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडत आहे. सीईटी सेलने बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आटोपली आहे. असे असताना बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या आणि सीईटीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाबाबत सीईटी सेलला विचारले असता त्यांनी जबाबदारी ढकलली आहे.

आता बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. यावर शिक्षणाधिकारी, संचालक यांच्यासह संपूर्ण प्रशासन मुग गिळून गप्प आहे. तर एरवी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढत असल्याचा दावा करणाऱ्या संघटना, संस्था देखील याबाबत आवाज उठवत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे बारावीची पुरवणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर टांगती तलवार कायम आहे.

बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये झालेल्या परीक्षेतील आकडेवारी :

तपशील : परीक्षा दिलेले एकूण विद्यार्थी : एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी

नियमित विद्यार्थी : ७,६७,३८६ : ६,८४,११८ : ८३,२६८

पुर्नपरीक्षार्थी : ३५,५८३ : १५,७७५ : १९,८०८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com