NEET Exam : ‘नीट’ परीक्षेच्या रोल नंबरमध्ये खाडाखोड

उत्तरपत्रिकेतही गैरप्रकार झाल्याची विद्यार्थिनींकडून तक्रार; चौकशीची मागणी
students Complaint mistake in answer sheet Demand inquiry roll number NEET exam kolhapur
students Complaint mistake in answer sheet Demand inquiry roll number NEET exam kolhapur

कोल्हापूर : भावी डॉक्टर होण्यासाठी ‘नीट’ परीक्षेसाठी तिने दिवसरात्र अभ्यास केला. मात्र, रोल नंबरमध्ये खाडाखोड करून केवळ २६ गुण मिळाल्याचा निकाल तिच्या हाती पडला. त्यामुळे तिच्यासह कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. रोल नंबर आणि उत्तरपत्रिकेत गैरप्रकार झाल्याबाबत त्यांनी ‘नीट’कडे ‘ई-मेल’द्वारे तक्रार नोंदविली आहे. पोहोचही मिळाली असली तरीही नेमका गैरप्रकार काय झाला याची माहिती अद्याप पुढे आली नाही. याचे गांभीर्य ओळखून खासदार धनंजय महाडिक यांनीही केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी पत्रव्यवहार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सृष्टी सुधाकर पाटील ही म्‍हाळुंगे (ता. करवीर) येथील विद्यार्थिनी असून तिने दिलेल्या नीट परीक्षेचा निकाल ७ सप्टेंबरला जाहीर झाला. त्यानंतर तिला मिळालेली ‘ओएमआर सीट’ तपासली तेव्हा त्यामध्ये खाडाखोड झाल्याचे दिसून आले. या संदर्भात तिच्या पालकांनी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)च्या संचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार सृष्टीच्या रिसिटवरील रोल नंबर ३१०८०२०५५२ असा आहे. त्याला कोडसुद्धा आहे.

‘एनटीए’च्या संचालकांची सही आहे. मात्र उत्तर पत्रिकेवर ३१०८०२८९५२ असा क्रमांक आहे. विशेष म्हणजे आकड्यांवर भरीव गोल करूनसुद्धा हा क्रमांक लिहिलेला असतो. त्यामध्ये शेवटच्या चौथ्या रकान्यातील ‘०’ ला ८ करण्यात आले आहे. तर त्या पुढील ‘५’ क्रमांकाला ‘९’ करण्यात आले आहे. ही खाडाखोड झाल्यामुळे ही उत्तरपत्रिका सृष्टी पाटीलची नाही, असा दावा तिने स्वतः आणि वडील सुधाकर यांनी केला आहे. तसेच या उत्तरपत्रिकेतील उत्तरेही चुकीची असून सृष्टीने ज्यावेळी परीक्षा दिली त्याच वेळी तिने प्रश्नपत्रिकेवर सुद्धा त्या पर्यायांना ‘टीकमार्क’ केली आहे. हे पाहता ही उत्तरपत्रिका सृष्टीची नसल्याचा तिच्या वडिलांचा दावा आहे.

‘खासदार महाडिक यांनी सुद्धा केंद्रीय मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे. आम्ही देखील तक्रार करून वारंवार स्मरणपत्रे दिली आहेत. याला पंधरा दिवस उलटून गेले. तरीही ही चूक नेमकी कोणाची आणि प्रत्यक्षात किती गुण मिळाले याचा खुलासा झालेला नाही. प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ‘नीट’ने याचा खुलासा करावा.

- सुधाकर पाटील (सृष्टी पाटीलचे वडील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com