esakal | पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आता 'न्यूट्रिटिव्ह स्लाईस' | Educational News
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूट्रिटिव्ह स्लाईस

या न्यूट्रिटिव्ह स्लाईसमध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीन हे मुख्य घटक असणार आहेत.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 'न्यूट्रिटिव्ह स्लाईस'!

sakal_logo
By
भीष्माचार्य ढवण

सासुरे (सोलापूर) : शालेय पोषण आहार (School nutrition diet) योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय शाळामधील पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना आता पौष्टिक असे 'न्यूट्रिटिव्ह स्लाईस' (Nutritious slices) वितरीत करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम लवकरच सुरू करण्यात येत असून, त्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत.

शाळा स्तरावर पुरवठा करण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावर निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या न्यूट्रिटिव्ह स्लाईसमध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीन हे मुख्य घटक असणार आहेत. त्याचबरोबर गहू आटा, लोह, साखर, दूध पावडर, पोषक खाद्यतेल यासह अन्य पौष्टिक घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात शाळांना पुरवठा करण्यासाठी पटसंख्या मागविण्यात येत आहे. त्यामुळे आता लवकरच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतून या सकस व चविष्ट आहाराची चव चाखायला मिळणार आहे.

हेही वाचा: भारतीय लष्करात टेक्‍निकल एंट्री स्कीम! अर्ज प्रक्रियेला सुरवात

विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार

पहिली ते पाचवीच्या प्रति विद्यार्थ्यासाठी एकूण 720 ग्रॅम तर सहावी ते आठवीच्या प्रति विद्यार्थ्यासाठी 1080 ग्रॅम वजनाची पाच - पाच पॅकिंग पाकिटे देण्यात येतील.

न्यूट्रिटिव्ह स्लाईसची वैशिष्ट्ये

  • न्यूट्रिटिव्ह स्लाईस सीलबंद पॅकेट स्वरूपात असेल

  • बिस्कीट पुड्याप्रमाणे असणार आकर्षक पॅकिंग

  • पटसंख्येनुसारच शाळांना उपलब्ध होणार

  • न्यूट्रिटिव्हचे एकूण पाच प्रकार असून प्रत्येक पॅक 120 ग्रॅमचे आहे

  • 120 ग्रॅम पॅकमध्ये 7.5 ग्रॅम वजनाच्या 16 न्यूट्रिटिव्ह स्लाईस असतील

  • मुख्य घटक ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, तेल, गहू, दूध पावडर, साखर आदी.

loading image
go to top