बारावीत महाविद्यालये बदलणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार उपलब्ध जागेत प्रवेश द्यावा - औदुंबर उकिरडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Students who changing 12th standard colleges should given admission in available space according to their academic quality Audumbar Ukirade

बारावीत महाविद्यालये बदलणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार उपलब्ध जागेत प्रवेश द्यावा - औदुंबर उकिरडे

पुणे : विद्यार्थ्यांकडून दरवर्षी शाखा बदलून मिळणे, पालकांची बदली, शाखा बदलून मिळणे अशा कारणास्तव इयत्ता बारावीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय बदलून देण्याची मागणी केली जाते. विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याच्या कारणांची खातरजमा करून मंजूर जागांच्या मर्यादेमध्ये आणि जागा उपलब्ध असल्यास त्याप्रमाणे गुणवत्तेनुसार संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असा आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना दिला आहे.

दरवर्षी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय सध्याच्या घरापासून लांब असणे, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव राहत असलेल्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे, शाखा बदलून मिळणे, विद्यार्थी राहण्याचा पत्ता बदलणे, विद्यार्थ्यांस बोर्ड बदलायचे आहे, अशा विविध कारणास्तव इयत्ता बारावीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत असते. या संदर्भात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेमध्ये व जागा उपलब्ध असण्याच्या अटीनुसार, बारावीसाठी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असेही उकिरडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बदलल्यानंतर आवश्यक त्या सुधारणा करून घेण्याची कार्यवाही संबंधित महाविद्यालयांनी करणे आवश्यक असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

‘‘विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याच्या कारणांची खातरजमा महाविद्यालयांनी करावी. मंजूर जागांच्या मर्यादेमध्ये व जागा उपलब्ध असल्यास त्याप्रमाणे आपल्या स्तरावरून गुणवत्तेनुसार संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत. कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याची कारणे आणि गुणवत्ता यांचे काटेकोर पालन करण्यात यावे. यामध्ये कोणतीही अनियमितता होणार नाही, याची दक्षता पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांकडून घेण्यात यावी,’’

- औदुंबर उकिरडे, विभागीय शिक्षण उपसंचालक

Web Title: Students Who Changing 12th Standard Colleges Should Given Admission In Available Space According To Their Academic Quality Audumbar Ukirade

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top