वेगळ्या वाटा : करप्रणालीत संधी

पारंपारिक टॅक्स प्रॅक्टिस, कर व्यवसायाचे स्वरूप, पद्धत बदलताना दिसत आहे.
Opportunity in tax process
Opportunity in tax processsakal

पारंपारिक टॅक्स प्रॅक्टिस, कर व्यवसायाचे स्वरूप, पद्धत बदलताना दिसत आहे.

प्रमुख मुद्दे असे -

1) कर क्षेत्रात नवीन येणारे कर सल्लागार (त्यामध्ये सनदी लेखापाल, वकील, कर सल्लागार, कंपनी सेक्रेटरी इत्यादी) यांनी कर व्यवसायात बदल केले पाहिजेत. काळानुरूप नवीन प्रणाली, नवीन तंत्रज्ञान, आपण लवकरात लवकर कसे आत्मसात करू, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

2) स्पर्धा वाढली आहे. सर्वच कर प्रणाली आता ऑनलाइन झाल्याने, वाणिज्य क्षेत्रातले काम सॉफ्टवेअरद्वारे चालतात. त्यात पुढे जाऊन भर पडणारे ते कृत्रिम बुद्धिमत्तेची, यामुळे मानवी हस्तक्षेपाची गरज पडणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता कर क्षेत्रात येणार आहेच. याकडे नवीन कर सल्लागारांचा कल पाहिजे.

3) वस्तू व सेवाकरात सर्वच तंत्रज्ञान आधारे, ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर्सद्वारे विवरणपत्र दाखल होतात, रिपोर्टस मिळतात. त्यामुळे अनेक व्यावसायिक काम हे तंत्रज्ञान आधारे होऊन जाते. वस्तू व सेवाकर विवरणपत्र अनेक कंपन्या स्वतःहून भरत आहेत, तरीही नॉन-कॉर्पोरेट उदा ः भागीदारी संस्था, वैयक्तिक मालक इत्यादी यांचे जी.एस.टी.चे काम, किंवा त्यामधील इतर सेवा आपण नक्कीच देऊ शकतो. वस्तू व सेवाकर अंतर्गत आव्हानात्मक कामांची सेवा आपण देऊ शकतो. इनपुट टॅक्स क्रेडिट रिपोर्ट्स, विवरणपत्र न-भरल्याचे रिपोर्ट, इंवोइसिन्ग सेवा आदी या सर्व गोष्टींचे बारकावे नवीन कर सल्लागारांना माहिती पाहिजेत.

4) बदलणारी ऑनलाइन प्रणाली, नवीन कायदे, नवीन तंत्रज्ञान, परिपत्रकाद्वारे वारंवार होणारे बदलाचा परिणाम व्यवसायावर पडला आहे.

5) अकाउंट्स लेखन पद्धत बदलून अकाउंट्स सॉफ्टवेअर आले, सर्व नोंदी एक्सेल, वर्ड कॉम्प्युटरद्वारे होतायत. लेखा परीक्षणाच्या पद्धतीत बदल झाला आहे. जी.एस.टी.मधील ऑडिटचे सनदी लेखापाल करून होणारे लेखा प्रमाणीकरण काढूनच टाकले गेले, स्वत:चे प्रमाणीकरण आणले गेले. प्राप्तिकर कायद्याप्रमाणे इन्कम टॅक्स ऑडिटची मर्यादा ५ कोटींवरून वाढून १० कोटी करण्यात आली. याचा परिणाम कर व्यवसायावर पडला.

6) कर सल्लागारांनी कर क्षेत्रात किंवा आर्थिक क्षेत्रात नवीन संधी, उत्पन्न स्रोत शोधायची गरज आहे. एकच काम करण्याचे दिवस संपले आहेत.

7) क्लायंटला जास्तीत जास्त सेवा देण्याची अपेक्षा असते, ते पूर्ण करण्याची क्षमता आपल्यामध्ये हवी.

8) सी.ए, सी.एस. व इतर शिक्षणाबरोबरच एल.एल.बी करण्याकडे कल वाढला आहे.

9) प्रत्यक्षकर व अप्रत्यक्षकर मधील न्यायाधीकरणामुळे, वकिली व्यवसायाची व्याप्ती वाढताना दिसत आहे, त्यामुळे एल.एल.बी. करणे सोयीचे आहे.

10) सी.ए, सी एस, करून सल्लागार होण्याव्यतिरिक्त कंपनीमध्ये रोजगारातील अधिक संधी आहे.

11) कर सल्लागारांनी सायबर लॉ क्षेत्र, गुंतवणूक क्षेत्र, ट्रान्स्फर प्रायसिंग, आंतरराष्ट्रीय कर क्षेत्र इत्यादी क्षेत्रांकडे वळले पाहिजे, यामधील संधी शोधल्या पाहिजेत.

या सर्वच बाबींमुळे कर व्यवसायाची पद्धत आता बदलण्याची गरज आहे.

(लेखक करसल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com