MBBS Abroad : सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयानुसार, परदेशातील कोणत्याही शिक्षण संस्थेत एमबीबीएस करण्यासाठी 'नीट' परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. २०१८ मध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) ने हा नियम तयार केला होता, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले.
परदेशातील कोणत्याही शिक्षण संस्थेत ‘एमबीबीएस’ करायचे असेल तर त्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा (नीट) उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने आज दिला.