MPSC Exam : जिद्द असावी तर अशी! अधिकारी होऊनच सुषमानं ठेवलं गावात पाऊल; एकाचवेळी चार पदांवर मारली बाजी

वरकुटे (ता. माण) येथील सुषमा मंडले यांचा विवाह पोलिस दलातील संतोष मंडले यांच्याशी झाला.
Sushma Mandale Great Success in MPSC Exam
Sushma Mandale Great Success in MPSC Exam esakal
Summary

सुषमा यांचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, त्यांनी यशाला घातलेली गवसणीमुळे माणच्या मातीत मानाचा तुरा रोवला आहे.

कलेढोण : स्त्री जिद्दीच्या अनेक कथा आपण वाचल्या असतीलच; पण लग्नानंतर पतीसोबत मुंबईत राहात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (Maharashtra Public Service Commission Exam) अभ्यास करीत एकाच वेळी चार पदांना गवसणी घालण्याची किमया वरकुटे (ता. माण) येथील सुषमा संतोष मंडले (Sushma Mandale) यांनी करून दाखवली आहे.

प्रचंड मेहनत व ध्यास घेऊन जिद्दीने अभ्यास करून मंडले यांनी महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागातील (Water Resources Department) सहायक अभियंता राजपत्रित अधिकारी या पदास गवसणी घातली आहे. वरकुटे (ता. माण) येथील सुषमा मंडले यांचा विवाह पोलिस दलातील संतोष मंडले यांच्याशी झाला.

Sushma Mandale Great Success in MPSC Exam
Loksabha Election : 'या' दोन मतदारसंघाबाबत राणेंचं मोठं विधान; शिंदे गटाची गोची? म्हणाले, उमेदवारी कोणाला द्यायची हे..

मात्र, घरातील एकतरी व्यक्ती ही उच्चपदावर असावी. पती संतोष व त्यांचे बंधू बंडोपंत मंडले यांची इच्छा होती. दारिद्र्यात जीवन कुढत बसण्यापेक्षा आपल्यातील एकाने तरी शासकीय पदावर असावे, ही त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांच्या या इच्छेला सुषमा यांनी आपले ध्येय बनविले. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला.

Sushma Mandale Great Success in MPSC Exam
Sulkud Water Scheme : आधी वादग्रस्त विधान, पण आता मुश्रीफांना इचलकरंजीबाबत घ्यावं लागणार नमतं; काय आहे कारण?

आर्थिक परिस्थितीची जाणीव असलेल्या सुषमा यांनी अभ्यासाला प्राधान्य देत गाव, नातेवाईक, मोबाईल व समाजापासून दूर राहणे पसंत केले. घरची परिस्थिती बेताची असतानाही मिळेल ते वाचन साहित्य हातात घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. जोपर्यंत आपण उच्च पदस्थ अधिकारी होणार नाही. तोपर्यंत गावात पाऊल ठेवणार नाही, अशी जिद्द त्यांनी मनात बाळगली.

Sushma Mandale Great Success in MPSC Exam
Asian Games : कष्टाचं झालं चीज! आशियाई क्रीडा स्पर्धेत आदितीचा 'सुवर्णवेध'; देदीप्यमान यशाने आई-वडील भारावले

याच ध्येयामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. त्यांना एकाच वेळी महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग, महाजनको, पुणे महानगरपालिका व महापारेषण येथे सहायक अभियंता राजपत्रित अधिकारी वर्ग दोन या पदावर बाजी मारली. यातील जलसंपदा विभागास त्यांनी प्राधान्य दिले. सुषमा यांचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, त्यांनी यशाला घातलेली गवसणीमुळे माणच्या मातीत मानाचा तुरा रोवला आहे.

घरातील सुनेला सून म्हणून नाही तर लेक, बहीण म्हणून घरच्यांनी प्रेरणा दिली. पती संतोष व दीर बंडोपंत यांनी जी उच्चपदाची स्वप्ने दाखवली, ती पूर्ण करण्यास यश आले. माझ्या यशात आई व कुटुंबीयांचा त्याग आहे. येणारा दिवाळी सण माझ्यासाठी आनंदाचा असेल.

- सुषमा मंडले, वरकुटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com