

TCS Hiring: 80% New Hires Need AI Skills, AI Revenue Hits 10%
esakal
TCS Hiring Strategy: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपल्या नोकरभरतीत एक अत्यंत मोठा बदल जाहीर केला आहे. येत्या काळात टीसीएसमध्ये होणाऱ्या एकूण नव्या भरतींपैकी तब्बल ८० टक्के पदे ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि नवीन डिजिटल तंत्रज्ञान माहित असलेल्या लोकांसाठी असणार आहेत.
कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) के कृतीवासन आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) आरती सुब्रमण्यम यांनी एका मुलाखतीदरम्यान या नव्या धोरणाची आणि कंपनीच्या उत्पन्नाची सविस्तर माहिती दिली आहे.