

Sustainable Development Goals and Education Reform
sakal
मृदुला अडावदकर (सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ)
नव्या वाटा
युनोने २०१५मध्ये शाश्वत विकासाची ध्येये निश्चित केली आणि ३०३०पर्यंत ती साध्य व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या अनुषंगाने चीन, सिंगापूर, न्यूझीलंड, जॉर्डन, फिनलंड, फ्रान्स, वगैरे अनेक देशांनी त्यांच्या शैक्षणिक धोरणांची नव्याने आखणी केली त्यात ‘सर्वसमावेशकता’ या तत्त्वाला महत्व दिलेलं दिसत आहे. भारतानेही आपलं नवीन शैक्षणिक धोरण आणलं.