
पूर्व रेल्वेने अनेक ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसंदर्भात नवी अधिसूचना जारी केली आहे.
रेल्वेत भरतीसाठी नवी अधिसूचना! दोन हजारांपेक्षा जास्त पदांची भरती होणार
रेल्वेमध्ये नोकरी (Job) करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) बंपर जागा काढल्या आहेत. पूर्व रेल्वेने (Eastern Railway) अनेक ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसंदर्भात नवी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 11 एप्रिल 2022 पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 असू शकते. भारतीय रेल्वेकडून अप्रेंटिस पदासाठी भरती निवड गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे.
हेही वाचा: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; आधी प्रवास करा, नंतर भाडे भरा; असा घ्या लाभ
अधिसूचनेनुसार या प्रक्रियेद्वारे हावडा विभाग, लिलुआ वर्कशॉप, सियालदाह विभाग, मालदा विभाग, जमालपूर वर्कशॉप, आसनसोल विभाग, कंचरापारा वर्कशॉपमध्ये फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन अशा एकूण 2972 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार rrcer.com अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महत्त्वाची तारीख
- अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 11 एप्रिल 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2022
हेही वाचा: रेल्वेत 10 वी, पदवीधरांना परीक्षेशिवाय नोकरी! अर्ज दाखल करण्यास सुरवात
योग्यता-
पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिस या पदांवर भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण झालेला असावा. त्याचबरोबर संबंधित व्यापाराकडे नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगने जारी केलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयाची अट-
पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांचे वय 15 वर्षे ते 24 वर्षे दरम्यान असावे. उमेदवार शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.
आवेदन शुल्क-
पात्र उमेदवारांनी 11 एप्रिल ते 10 मे 2022 या कालावधीत rrcer.com अधिकृत संकेतस्थळाच्या मदतीने ऑनलाईन अर्ज करावा. सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांनी 100 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.
Web Title: The Eastern Railway Has Issued A Fresh Notification Regarding The Recruitment Of Several Trade Apprentice Posts
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..