Fulfilling Life
sakal
- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
काही दिवसांपूर्वी एका चित्रपट अभिनेत्याची मुलाखत ऐकली. एका प्रश्नाच्या उत्तरात, बोलता-बोलताच तो अक्षरशः ढसढसा रडायला लागला. त्या अभिनेत्याची भावना खूप प्रामाणिक होती. तो सांगत होता, ‘पैसा कमावण्याच्या नादात मी इतका प्रचंड मग्न होऊन गेलोय की, महागडी गाडी, घर आहे. घराखालून जातो, परंतु वर जाऊन आईला भेटता येत नाही.