
- डॉ. सचिन जैन, संस्थापक-संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
हसा लेक हो आणि हसवा - पु. ल. देशपांडे यांनी विविध माध्यमातून, लेखामध्ये, पुस्तकांमधून हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. नुसते स्मित हास्य केले तर चेहऱ्यावरच्या १५-१७ स्नायूंचा व्यायाम आणि उपयोग होतो. मन उदास किंवा विचलित असल्यास फक्त चेहऱ्यावर स्मित हास्य आणा आणि बघा तुमचे स्नायू किती शिथिल होतात आणि मन निवांत आणि सुखद होते. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर हा साधा प्रयोग करून बघा.