esakal | कोरोना महामारीमुळे परीक्षांवर टांगती तलवार; लवकरच होणार CA परीक्षेची मोठी घोषणा

बोलून बातमी शोधा

CA
कोरोना महामारीमुळे परीक्षांवर टांगती तलवार; लवकरच होणार CA परीक्षेची मोठी घोषणा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : ICAI CA Exam 2021 : 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया'च्या (आयसीएआय) सहयोगाने सनदी परीक्षा घेणाऱ्या संस्था चार्टर्ड अकाउंटंट, इंटरमीडिएट (ओल्ड स्कीम), इंटरमीडिएट (न्यू स्कीम) आणि अंतिमची (ओल्ड आणि न्यू स्कीम) परीक्षा मे 2021 च्या अनुषंगाने घेतली जाणार असल्याचे एका पत्रकात जाहीर केले आहे. दरम्यान, या महिन्याच्या अखेरीस देशभरात पसरलेल्या कोविडच्या अनुषंगाने मे आणि जून 2021 या कालावधीत प्रस्तावित सीएच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

आयसीएआयच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धीरज खंडेलवाल यांनी गुरुवार 22 एप्रिल रोजी ट्विट करत म्हटले आहे की, मला परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत बरेच प्रश्न विचारले जात आहेत." मात्र, याबाबत आयसीएआय आणि परीक्षा समिती योग्य तो निर्णय घेईल. कदाचित, या महिन्याच्या अखेरीस समिती आपली भूमिका जाहीर करेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे.

AIMS मॅनेजमेंटचे Admit Card जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा

सीए फाउंडेशन परीक्षेची 4 मे'पर्यंत अंतिम नोंदणी

जूनमध्ये 24, 26, 28 आणि 30 तारखेच्या प्राथमिक फाऊंडेशन कोर्स परीक्षांची नोंदणी प्रक्रिया चालू आहे आणि यासाठी अंतिम तारीख 4 मे असून ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सीए फाउंडेशन परीक्षा 2021 साठी नोंदणी केली नाही, त्यांनी आपला परीक्षा फॉर्म संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर icaiexam.icai.org ऑनलाईन सादर करता येणार आहे.

आयसीएआयने पूर्वी केलेल्या घोषणांनुसार, सीए इंटरमीडिएटच्या परीक्षा 22 मे 2021 पासून सुरू होतील आणि अंतिम कोर्स परीक्षा 21 मे पासून सुरू होणार आहेत. सीए फाउंडेशनचे पेपर दोन शिफ्टमध्ये असतील आणि त्याची भाषा माध्यम हिंदी आणि इंग्रजी दोन्ही असेल.