- डॉ. राजेश ओहोळ, करिअर तज्ज्ञनागरिक, नैसर्गिक पर्यावरण आणि आर्थिक व्यवस्था यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांवर आपले जीवन अवलंबून आहे. विसाव्या शतकात झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे या संबंधांवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे परिणाम झाला आहे..प्रदूषणाच्या विक्रमी पातळीने पर्यावरणावर मोठा ताण निर्माण केला आहे. ही चिंता लक्षात घेऊन विविध पर्यावरणीय समस्यांना तोंड देण्यासाठी ‘क्लीन टेक्नॉलॉजी’ म्हणजेच स्वच्छ तंत्रज्ञानातील संशोधनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते आहे..‘एन्ड-ऑफ-पाइप’ अबेटमेंट तंत्रज्ञानापेक्षा वेगळे असलेले स्वच्छ तंत्रज्ञान उत्पादन प्रक्रियेत कचरा प्रवाहांची निर्मिती कमी करते आणि प्रदीर्घ काळ कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऐवजी इतर उपभोग्य वस्तू आणि उत्पादन प्रक्रियांमधून त्या कचऱ्याचा पुनर्वापर करते. सर्वसाधारणपणे, स्वच्छ तंत्रज्ञान कच्च्या मालाचा आणि ऊर्जेचा वापर पारंपरिक तंत्रज्ञानांपेक्षा कमी प्रमाणात करतात, ते तंत्रज्ञान प्रदूषण कमी करण्यावर भर देतं. या कारणास्तव, ते उत्पादकाला महत्त्वपूर्ण फायदे करून देतं..स्वच्छ तंत्रज्ञानामागील विज्ञान आणि अभियांत्रिकीमुळे ते अधिक वैशिष्ट्यपूर्ण झाले आहे. याशिवाय ते उत्पादने आणि प्रक्रियांच्या स्वच्छतेचे डिझाइन, विश्लेषण आणि मोजमाप करण्यासाठी गणितीय आणि संगणक-आधारित पद्धती आणि मॉडेल्सचे परीक्षण करते..स्वच्छ तंत्रज्ञानयात उत्पादनासाठी एक संकल्पनात्मक किंवा प्रक्रियात्मक दृष्टिकोन समाविष्ट आहे. या दृष्टिकोनाच्या आधारे उत्पादनाच्या किंवा प्रक्रियेच्या जीवनचक्राच्या सर्व टप्प्यांवर मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोके रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाते. स्वच्छ तंत्रज्ञान म्हणजे प्रदूषक किंवा कचरानिर्मिती कमी करण्यासाठी सामग्री, प्रक्रिया किंवा पद्धतींचा वापर करून स्त्रोतावरील पर्यावरणीय नुकसान टाळणे..वापरभूतकाळातील मानवी हस्तक्षेप किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी स्वच्छतेच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कोणत्याही प्रक्रियेच्या स्थापित संयंत्रात पुनर्रचना, सुधारणा किंवा प्रदूषण कमी करण्याचे उपाय जोडून पर्यावरणीय नुकसान कमी करणे, पर्यावरणीय नुकसान कमी करण्यासाठी नवे तंत्र विकसित करणे आणि अंमलात आणणे यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे क्षेत्र कचरा व्यवस्थापन, अक्षय ऊर्जा आणि औद्योगिक प्रक्रिया यांसारख्या विविध पैलूंचा शोध घेते, ज्याचे उद्दिष्ट अधिक शाश्वत भविष्य निर्माण करणे आहे..आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनस्वच्छ तंत्रज्ञानामध्ये अनेक तंत्रज्ञान व तत्त्वे समाविष्ट आहेत जसे की, अक्षय ऊर्जा, अक्षय कच्चा माल, जीवनचक्र मूल्यांकन, अभिक्रिया आणि पृथक्करणाची तत्त्वे, विषम उत्प्रेरक, जैवतंत्रज्ञान, सुपरक्रिटिकल द्रवपदार्थ, ऑक्सिडंट म्हणून हवा इत्यादी.हे तंत्रज्ञान कृत्रिम सेंद्रिय रसायनशास्त्र, भौतिक रसायनशास्त्र, उत्प्रेरक आणि रासायनिक अभियांत्रिकी यासारख्या अंतर्निहित विज्ञानाच्या चांगल्या समजुतीवर आधारित आहेत. हरित प्रक्रियेत हरित रसायनशास्त्र प्रतिमान आणि इतर अनेक अभियांत्रिकी तत्त्वे समाविष्ट असल्याचे दिसून येते..त्यामुळेच स्वच्छ तंत्रज्ञानासाठी एक आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये विविध विषयांमधील अभियंते आणि शास्त्रज्ञ एकत्र येऊन काम करतात. ते असे तंत्रज्ञान विकसित करतात की, त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या संसाधनांना बाधा येत नाही आणि विषारी रसायनांच्या वापरामुळे वनस्पती आणि प्राणी नष्ट होण्याचे प्रमाणही कमी होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.