Rational Decision Makingsakal
एज्युकेशन जॉब्स
संतुलित आणि समतोल निर्णय
करिअरच्या दृष्टीने जी कौशल्ये महत्त्वपूर्ण आहेत, त्यातील ‘निर्णय’ घेण्याची क्षमतादेखील आवश्यक आहेत.
- डॉ. सचिन जैन, संस्थापक-संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
करिअरच्या दृष्टीने जी कौशल्ये महत्त्वपूर्ण आहेत, त्यातील ‘निर्णय’ घेण्याची क्षमतादेखील आवश्यक आहेत. मागील दोन लेखांमध्ये आपण निर्णय घेण्याचे विविध पैलू बघितले, त्यातच पुढे आहे, निर्णय संतुलित आणि समतोल कसा घ्यावा आणि त्याचे आपल्या करिअरवर कसे परिणाम होतात ते लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक निर्णय अचूक असेल अशी अपेक्षा मुळातच चुकीची आहे. परंतु वेळेवर, आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवून निर्णय घेणे जास्त जरूरीचे आहे.