
डी. एस. कुलकर्णी - जीवन कौशल्य प्रशिक्षक
Loving yourself is not vanity, it is sanity!
...आंतरजालावरून साभार
फार छान गोष्ट एकदा वाचनात आली. एकदा एका माणसाचे गाढव खड्ड्यात पडले. शेतकऱ्याने गाढवाला वर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यर्थ. शेवटी त्याने विचार केला, नाहीतरी गाढव म्हातारेच झाले आहे. गाडून टाकू गाढवाला त्याच खड्ड्यात. तशी त्याने गाढवावर माती टाकायला सुरुवात केली. गाढवाला कृतघ्न माणसाचा राग आला. परंतु त्याच्यातील विवेकाने, रागावर मात केली. ‘पहिले जीव वाचवूया,’ या विचाराने उचल खाल्ली.