- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
Ask yourself if what you are doing today is getting you closer to where you want to be tomorrow.
- Radma Verix
अनुष्का एक मनस्वी मुलगी. कायम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार. आई-वडिलांची लाडकी आणि अर्थात नातेवाइकांमध्ये अत्यंत प्रिय. आदर्श वगैरे. तिला दहावीला ९७ टक्के गुण मिळाल्यावर काय जल्लोष....नंतर रीतसर अकरावी सायन्सला प्रवेश. पुढचा हमरस्ता ठरलेला की ठरवलेला? इंजिनिअरिंग? मेडिकल? परंतु तुपात माशी पडली.