
श्रीराम हसबनीस - चित्रकार, व्हिज्युअल आयडेन्टिटी डिझायनर
कोणत्याही प्रसिद्ध वस्तूच्या उत्पादक कंपनीचं नाव घेतलं की, त्याचा ‘लोगो’ डोळ्यांसमोर येतो. ‘लोगो’ म्हणजे केवळ एक चिन्ह किंवा आकार नाही, तर त्या तो उत्पादनाची ओळख, समाजमनातील प्रतिमा असतो. त्यामुळे लोगो साकारताना हवी कल्पक बुद्धी, कलेचा हात आणि सजग, संवेदनशील मन.