True Purpose of Education Empowering Students
sakal
शिक्षण धोरणाच्या पहिल्याच वाक्यात नमूद केल्याप्रमाणे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट केवळ माहिती देणे नसून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास, समानता व न्यायप्रिय समाजाची निर्मिती आणि राष्ट्राचा विकास घडविणे हे आहे.
शिक्षणाचा सर्वप्रथम उद्देश व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे. शारीरिक, भावनिक, मनोकायिक आणि बौद्धिक विकासाचा समतोल साधून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची पूर्ण क्षमता विकसित करता यावी, यावर धोरणात भर दिला आहे. या प्रक्रियेचा सर्वोच्च बिंदू म्हणजे स्व-प्रत्यक्षीकरण. जे अब्राहम मॅस्लो यांनी मांडले, आणि भारतीय तत्त्वज्ञानात ज्याला आनंदमय कोशाचा विकास असे म्हणता येते. यासाठी शिक्षण कसे असावे, याचा विचार आपण पूर्वी पाहिला आहे.