Quantum Computing
sakal
- प्रतीक्षा वाघ, साहायक प्राध्यापक
जग वेगाने बदलत असताना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातही झपाट्याने क्रांती घडत आहे. अशा वेळी पारंपरिक संगणकीय मर्यादांवर मात करत क्वांटम संगणन उत्कृष्ट पर्याय म्हणून पुढे येत आहे. विशेषतः यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये, जिथे जटिल गणितीय मॉडेलिंग, सिम्युलेशन आणि बहुपरिमिती ऑप्टिमायझेशन आवश्यक असते, तेथे क्वांटम संगणनाचे उपयोग भविष्यासाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहेत.