Career Tips : यशस्वी करिअर घडवण्यासाठी ‘या’ डिजिटल स्किल्सची घ्या मदत

आजकाल प्रत्येक ठिकाणी डिजिटल साक्षरता महत्वाची झाली आहे.
Career Tips
Career Tipsesakal

Career Tips : सध्याचा जमाना हा डिजिटलचा आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे, करिअरचे कोणतेही क्षेत्र असुद्या किंवा एखादा व्यवसाय असुद्या, आजकाल प्रत्येक ठिकाणी संगणक आणि डिजिटल साक्षरता महत्वाची झाली आहे. शिवाय, ही डिजिटल कौशल्ये येणे ही काळाजी गरज बनली आहे.

थोडक्यात काय तर या डिजिटल कौशल्यांशिवाय जीवन अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे, या मुलभूत डिजिटल कौशल्यांचे ज्ञान असणे आवश्यक झाले आहे. नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसायासाठी फक्त शिक्षण असून उपयोग होणार नाही.

या डिजिटल स्किल्समध्ये अनेक प्रकारच्या बेसिक गोष्टींचा समावेश आहे. ब्लॉग लिहिणे, क्लाऊड सर्व्हिसमधील फोटोंचा बॅकअप घेणे इत्यादी अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आढळून येतो. त्यामुळे, करिअरच्या सुरूवातीलाच किंवा महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांनी ही मुलभूत डिजिटल कौशल्ये शिकली पाहिजेत. आज आपण अशाच काही डिजिटल स्किल्सबद्दल जाणून घेणार आहोत.

Career Tips
Career Tips : बारावीनंतर करिअरचे क्षेत्र निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

व्हिडिओ एडिटिंग स्किल्स

व्हिडिओ एडिटिंगचे कौशल्य अवगत असणे हे आताच्या डिजिटल युगात अतिशय महत्व आहे. या स्किल्सचा डिजिटल स्किल्समध्ये समावेश होतो. तुमच्या काही वेगळ्या आयडियाज असतील त्या सादर किंवा व्यक्त करण्याचा हा अतिशय प्रभावी मार्ग आहे. आजकाल अशा व्हिडिओंना आणि रील्सला तरूणाईकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. त्यामुळे, हे स्किल तुम्ही शिकलेच पाहिजे.

फोटोशॉप आणि एडिटिंगचे बेसिक नॉलेज

ज्या विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह मीडिया, पत्रकारिता, आर्ट्स आणि इतर संबंधित क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी ही कौशल्ये अतिशय महत्वाची आहेत. तुमचे फोटोशॉप कौशल्य देखील खूप उपयुक्त ठरेल.

त्यामुळे, लवकरात लवकर हे डिजिटल स्किल्स शिका आणि तुमच्या करिअरला हातभार लावा. आजकाल युट्यूब किंवा इतर ऑनलाईन माध्यमांवर देखील ही कौशल्ये तुम्ही मोफत आणि घरबसल्या शिकू शकता.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि गुगल ड्राईव्ह

डिजिटल युगात मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि एक्सेल सारख्या सॉफ्टवेअरची विविध वैशिष्ट्ये अवगत असणे हे फार महत्वाचे आहे. हे डिजिटल स्किल्स आज ही प्रत्येकाला येतात असे नाही. खूप कमी लोक असतील जे, या तिन्ही माध्यमांमध्ये प्रवीण असतील.

आजकाल अनेक ऑफिसेसमध्ये किंवा अनेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करणे, किंवा लवकर पीपीटी बनवणे असे टास्कस करावे लागतात. त्यामुळे, या गोष्टींचे ज्ञान असणे आणि गोष्टी शिकून घेणे महत्वाचे आहे. अन्यथा तुम्ही या कार्पोरेट जगात मागे पडालं.

Career Tips
Career Tips : ऑफिसमधील कामाचे प्रेशर कमी करण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्सची घ्या मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com