पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील तिसरी नियमित फेरी जाहीर करण्यात आली आहे. या प्रवेश फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करून अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे..तर, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवीत अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया येत्या मंगळवारपासून (ता. २२) सुरू होणार आहे. या फेरीतील निवड यादी २६ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.राज्यातील नऊ हजार ४८३ कनिष्ठ महाविद्यालयांमधील एकूण २१ लाख ३७ हजार ५५० जागांकरिता केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण १४ लाख ११ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे..या प्रक्रियेअंतर्गत सध्या दुसऱ्या नियमित फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रमाणे, राज्यातील जवळपास एक लाख ६६ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी शनिवारपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केला आहे.दरम्यान, दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपर्यंत (ता. २१) प्रवेश घेता येणार आहेत. एकीकडे ‘कॅप’अंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया सुरू असतानाच, दुसरीकडे विविध कोट्याअंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया सुरू असणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले..विभागनिहाय दुसऱ्या नियमित फेरीअंतर्गत आतापर्यंत झालेले प्रवेश :विभाग : कॅप प्रवेश : कोटा प्रवेशअमरावती : १०,९६० : ३,१७४छत्रपती संभाजीनगर : १६,३३६ : १२,२०६कोल्हापूर : १०,६०५ : २,७५६लातूर : ८,११८ : २,०४७मुंबई : ३१,८८८ : ७,७०६नागपूर : १५,२५२ : २,१९७नाशिक : १४,३२१ : २,५०९पुणे : २१,७३७ : ४,९४३.तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक :तपशील : कालावधी- नवीन कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी, नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जाचा भाग एक भरणे : १९ ते २१ जुलै- प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जाच्या भाग एकमध्ये दुरुस्ती करणे, अर्जाचा भाग दोन भरणे, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविणे : २२ ते २३ जुलै- तिसऱ्या नियमित फेरीतील ॲलॉटमेंट पोर्टलवर जाहीर करणे, विद्यार्थी आणि महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये तपशील दर्शविणे, विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे संदेश पाठविणे, कट-ऑफ जाहीर करणे : २६ जुलै.- प्रवेशासाठी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करणे, विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे, प्रवेश घेणे, प्रवेश नाकारणे, प्रवेश रद्द करणे : २६ ते २८ जुलै- रिक्त जागा प्रदर्शित करणे : ३० जुलैप्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :https://mahafyjcadmissions.in/.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.