ऑफिसमध्ये प्रभावी देहबोलीचे आहेत असंख्य फायदे, जाणून घ्या सविस्तर

tips for body language while communicating in your office Marathi article
tips for body language while communicating in your office Marathi article

पुणे : ऑफिसमध्ये दरोरोज काम करताना आपण आपल्या  सहकाऱ्यांशी कशा पध्दतीने वागता, बोलता. तसेच आपली देहबोली कशी आहे हा आपल्या करियरच्या वाढीसाठी खूप महत्वाचा घटक आहे. आपण बोलण्यातून फक्त वीस ट्क्केच कम्यूनिकेट करतो, उर्वरित कम्यूनिकेशन हे आपली देहबोली आणि इतर व्यवहारातून होत असते. जर तुम्ही काम करत असतान तणावाखाली असाल किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्या देहबोली (बॉडी लँग्वेज)मधून सगळ्यांना कळत असतात. 

या सर्व कारणांमुळे आपल्याला आपल्या देहबोली (बॉडी लँग्वेज) वर काम करणे फार महत्वाचे आहे. प्रभावीपणे कम्यूनिकेशनमुळे तुमच्या प्रगतीची शक्यता आणखी वाढते. बॉड लँग्वेज प्रभावी करण्यासाठी काही प्रभावी टिप्स आपण जाणून घेणार आहोत. 

  •  संभाषणादरम्यान, सरळ (ताठ) बसा आणि कंफर्टेबल राहा. या मुळे तुम्ही व्यवस्थित श्वास घेऊ शकाल आणि तुमचा तणाव देखील कमी होईल.
  • बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळ घालून संभाषण करा . जेव्हा आपण आपल्या डोळ्यांत पाहून बोलता तेव्हा तुम्ही सोमरच्या व्यक्तीशी चांगल्या प्रकारे  जाता आणि त्यामुळे तुमचे संबंध सुधारतात. 
  • संभाषणादरम्यान, समोरच्या बरोबर योग्य समन्वय साधण्यासाठी चेहऱ्यावर स्माईल असणे देखील गरजेचे आहे. यामुळे सहकाऱ्यांना तुमच्याशी  बोलणे चांगले आणि ते आपल्याशी आणखी बोलण्यास इच्छुक राहतील. 
  • नेमके शब्द वापरल्याने तुमचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच, आपण जे काही बोलता ते आत्मविश्वासाने सांगा. आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर आपण लोकांमध्ये एक मजबूत प्रतिमा तयार करता. 
  • बोलताना इतर सहकाऱ्यांचे काळजीपूर्वक ऐकणे देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा ते काही बोलतात तेव्हा ते त्यांच्या समर्थनास होकार द्या किंवा त्यांचे समर्थन करताना तुम्ही त्याबद्दल स्वतःचे मत देखील सांगू शकता. 
  • संभाषणात आपल्या सहका ऱ्यांची इंटरेस्ट वाढविण्यासाठी आपण त्यांना काही चांगले  प्रश्न देखील विचारू शकता, त्या प्रश्नाचे उत्तर देताना ते काही महत्वाची माहिती देखील सांगतील. प्रश्न विचारल्यान संभाषण एकअंगी राहत नाही. 
  • बर्‍याच वेळा आपणास संभाषणात एखादा अवघड प्रश्न विचारला जातो ज्याचे उत्तर तुम्ही देऊ शकणार नसता, अशा परिस्थितीत शांत राहणे गरजेचे असते आपण या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काही वेळ घेत विचारू शकता किंवा तो प्रश्न टाळू शकता. 
  • ऑफिसमध्ये असेही बरेच लोक असतात जे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांशी बोलताना तुम्हाला विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. जर कोणी तुमच्याशी अत्यंत आक्रमकपणे बोलत असेल तर स्वतःवर संयम ठेवा आणि संभाषणात नकारात्मकतेस येऊ देऊ नका. तुम्ही सकारात्मक असाल तरच आपल्या सहकार्यांशी योग्य पध्दतीने बोलू शकाता आणि त्यांच्या प्रश्नांना विचारपूर्वक उत्तरे देऊ शकाता.
  • जेव्हा आपण ऑफिसमध्ये कामादरम्यान सहकार्यांशी संवाद साधता तेव्हा आपली शरीरिक भाषाच त्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत असते.  आपण स्वत: वर विश्वास ठेवला आणि आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केले तर आपण कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या समस्येवर मात करु शकता. हे लक्षात. जर आपला दृष्टीकोन योग्य असेल आणि आपण आपल्या सहकार्यांशी योग्य मार्गाने कम्यूनिकेट करण्यात सक्षम असाल तर आपल्या बर्‍याच अडचणी सुटतात आणि तुम्ही करियरमध्ये चांगली प्रगती करता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com