

Career Opportunities in Tissue Engineering
Sakal
डॉ. राजेश ओहोळ (करिअर मार्गदर्शक)
संशोधनाच्या वाटा
उती अभियांत्रिकी (टिश्यू इंजिनिअरिंग) हे शरीरातील खराब झालेल्या उतींच्या जागी नवीन उती तयार करण्याचे आणि त्यांचे उत्पादन करण्याचे शास्त्र आहे. उती अभियांत्रिकी हे संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाचे एक उदयोन्मुख आंतरविद्याशाखीय क्षेत्र आहे. त्यामध्ये आरोग्य सेवा उपचारांच्या पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणण्याची आणि जगभरातील लाखो लोकांच्या आरोग्याची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारण्याची क्षमता आहे.