esakal | HSC RESULT : निकालाची तारीख आज जाहीर होणार, जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

 HSC Result

HSC RESULT : निकालाची तारीख आज जाहीर होणार, जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या रखडलेल्या बारावीच्या निकालाची (HSC result) तारीख आज रविवारी, 1 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे सोमवारी, 2 ऑगस्ट रोजी दुपारी ऑनलाईन हा निकाल (online result) जाहीर होण्याची शक्यता मंडळातील सूत्रांकडून देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) बारावीचा निकाल 31 जुलै पूर्वी जाहीर करण्याचे निर्देश दिले होते परंतु राज्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (flood) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कनिष्ठ महाविद्यालय मधून काही माहिती न मिळाल्याने निकाल जाहीर करण्यास दिरंगाई (result announcement late) झाल्याचे मंडळातील अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले. ( Today HSC result date announcement is there says education authorities sources-nss91)

हेही वाचा: HSC Result 2021: बारावीचा निकाल लवकरच होणार जाहीर

मात्र आता मंडळाची निकाल जाहीर करण्यासाठी तयारी पूर्ण झाली असल्याने हा निकाल सोमवारपर्यंत जाहीर केला जाणार असून त्यासाठी घोषणाही केली जाईल अशी माहिती देण्यात आली. बारावीचा निकाल 31 जुलैपूर्वी लागेल अशी अपेक्षा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना लागली होती. परंतु मंडळाकडून यासाठीची कोणतीही घोषणा न करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा आणखी वाढली आहे. दरम्यान केंद्रातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाले असून मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यास उशीर होत असल्याने त्याचा मोठा फटका राज्यातील काही विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यतानिर्माण झाली आहे. त्यामुळे अगोदर निकाल जाहीर करून त्यानंतर इतर प्रक्रिया केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

loading image
go to top