अकरावी CET नोंदणीसाठी आज अखेरची मुदत, लाखो विद्यार्थी प्रक्रियेपासून दूर

Eleventh CET
Eleventh CETsakal media

मुंबई : राज्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी (eleventh admission) घेण्यात येणाऱ्या सीईटीच्या नोंदणीसाठी (CET registration) सोमवारी 2 ऑगस्ट रोजी अखेरची मुदत आहे. आत्तापर्यंत लाखो विद्यार्थी (students) नोंदणी पासून दूर असून या मुदतीत सीईटीसाठी नोंदणी न केल्यास विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून (exam) दूर राहावे लागणार आहे. ( today is the last date of eleventh cet ragistration-nss91)

राज्य शिक्षण मंडळाकडून सीईटीच्या प्रवेश परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून त्यास पार्श्‍वभूमीवर या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. रविवारी सायंकाळपर्यंत 11 लाख 25 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. 26 जुलै पासून सीईटीसाठी असलेले संकेतस्थळ अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे.

Eleventh CET
MPSC : रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाने जारी केला 'जीआर'

त्यामुळे राज्यभरात कुठलाही विद्यार्थ्यांना अडचणी येत नाहीत. म्हणूनच मागील चार दिवसात प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यामुळे 2 ऑगस्ट नंतर या नोंदणीसाठी कुठलीही मदतवाढ दिली जाणार नाही त्यामुळे अखेरच्या मुदतीपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहनही त्यांनी केले. अकरावी सीईटीच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात केंद्रीय मंडळाच्या पालकांनी धाव घेतली असून त्यावर 4 जुलै रोजी सुनावणी होणार आहे मात्र त्यापूर्वीच या नोंदणीसाठीची मुदत संपत असल्याने त्याविषयी न्यायालयात काय भूमिका मांडली जाईल हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या नोंदणी प्रक्रियेत सीबीएसई आयसीएसई, आयबी आणि केंद्रीय मंडळांच्या असंख्य विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्याची आकडेवारी सोमवारी मंडळाकडून जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com