
या ७ आयटी कंपन्या करिअरसाठी देतात मोठी संधी; लवकरच होणार भरती
मुंबई : सर्व सुविधा आणि भरगच्च पगार अशी नोकरी कोणाला नको असते ? पण भारतात अशा कंपन्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे नोकरीसाठी अर्ज करताना विचारपूर्वक अर्ज करावा लागतो. आज आपण अशा काही कंपन्यांविषयी जाणून घेऊ या जिथे काम करणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं.
Tata Consultancy Services (TCS)
TCS ही अशी कंपनी आहे जिथे ५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. भारतातील इतर आयटी कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीत काम करण्यासाठी अधिक चांगले वातावरण कर्मचाऱ्यांना मिळते. कंपनीचा दावा आहे की त्यांनी एप्रिल ते डिसेंबर २०२१ मध्ये १ लाख १० हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली
Accenture
गेल्या वर्षीच्या जेंडर न्यूट्रल पॉलिसीनुसार अॅक्सेंचर ही कंपनी आपल्या ५०:५० ध्येयाच्या जवळ पोहोचली आहे. आता येथील एकूण कर्मचारी संख्येचा ४५ टक्के महिला आहेत. आता ही कंपनी जयपूर आणि कोईंबतूर यांसारख्या टायर २ शहरांमध्ये आपली कार्यालये सुरू करत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त कुशल कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांना पोहोचता येईल. सध्या मुंबई, हैदराबाद, बंगळुरू येथे या कंपनीची कार्यालये आहेत.
Cognigent
२०२२ सालात ५० हजार फ्रेशर्सची भरती करण्याची कॉग्निजंटची योजना आहे. या कंपनीचे मुख्यालय न्यू जर्सीमध्ये आहे. पदोन्नती आणि हायर बोनससह कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि विकास यांत ही कंपनी गुंतवणूक करते. २०१५नंतर प्रथमच २०२१ साली कंपनीने दोन अंकी नफा कमवला.
Infosys
इन्फोसिस ही १०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणारी चौथी भारतीय कंपनी आहे. आपल्या डिजिटल रेस्किलिंग प्लॅटफॉर्मवर १० लाख २० हजार वापरकर्त्यांना सामील करून इन्फोसिसने आपली बाजारातील प्रतिष्ठा वाढवली आहे. कंपनीने २०१२ साली ५५ हजार पदवीधरांना काम दिले.
Capgemini
या कंपनीची जवळपास अर्धी कर्मचारी संख्या भारतात आहे. ही फ्रान्सची कंपनी आहे. 5जी आधारित एंटरप्राइज-ग्रेड, क्वांटम कंप्यूटिंग, मेटावर्स और सिंथेटिक बायोलॉजी अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याची योजना कंपनीने केली आहे. यावर्षी ६० हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
Wipro
विप्रोमध्ये २०२३ या वर्षात ३० हजार फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. या कंपनीने नुकतेच यूएसस्थित सायबर सिक्योरिटी कंस्लटेंसी एडगिलचेा अधिग्रहण केले आहे. गेल्या वर्षी विप्रोन रिटर्न टू वर्क कार्यक्रमही सुरू केला होता. यामध्ये ब्रेकनंतर आपले करिअर पुन्हा सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना संधी दिली गेली.
IBM
आयबीएम २०२२ मध्ये व्यापक विकास धोरण आखत आहे. यामध्ये विकास केंद्रांच्या निर्मितीवर लक्ष दिले जाणार आहे. आयबीएमने २०२० सालापासून जवळपास २० कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. नॉन मेट्रो शहरांमध्ये विस्तार करण्याचे कंपनीचे ध्येय आहे.
Web Title: Top 7 It Companies For Better Career Opportunity
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..