HSC Result : जुळ्या बहि‍णींनी एकत्र केला अभ्यास अन् बारावी परीक्षेत मिळवलं अनोखं जुळं यश, टक्के वाचून व्हाल शॉक

दहावीच्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत देखील दोघींनी घवघवीत यश संपादन केले होते.
Riddhi and Siddhi Ropalkar 12th Exam Result
Riddhi and Siddhi Ropalkar 12th Exam Resultesakal
Summary

दहावीला येथील कवठेकर प्रशाले मधून सिद्धी व रिद्धी या दोघींनी ९८.६० टक्के एकसारखे गुणप्राप्त करीत पंढरपूरमध्ये दोघींनी पहिला येण्याचा मान पटकावत जुळे यश संपादन केले होते.

पंढरपूर : पंढरपूरमधील केबीपी महाविद्यालयातील (KBP College) विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी सिद्धी व रिद्धी संतोष रोपळकर या जुळ्या बहिणींनी बारावीच्या परीक्षेत (12th Exam Result) महाविद्यालयामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सिद्धी रोपळकर हिने ९२.१७ टक्के, तर रिद्धीने ९१.८३ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या दोन्ही जुळ्या बहिणींनी बारावी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्क्याहून अधिक गुण प्राप्त करीत अनोखे जुळे यश प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पंढरीतील बांधकाम व्यावसायिक व सिव्हिल इंजिनिअर (Civil Engineer) संतोष रोपळकर यांना सिद्धी व रिद्धी या दोन जुळ्या मुली आहेत. कुशाग्र बुद्धीच्या या दोन्ही जुळ्या बहिणी शालेय जीवनापासूनच अभ्यासामध्ये प्रगतीपथावर आहेत. विशेष बाब म्हणजे, दहावीच्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत देखील दोघींनी घवघवीत यश संपादन केले होते.

Riddhi and Siddhi Ropalkar 12th Exam Result
अबबऽऽऽ चक्क मिळाले 100 टक्के गुण! बुद्धिबळ खेळणाऱ्या तनिषाने 100 टक्के गुण मिळवत जिंकला 'बारावी'चा डाव

दहावीला येथील कवठेकर प्रशाले मधून सिद्धी व रिद्धी या दोघींनी ९८.६० टक्के एकसारखे गुणप्राप्त करीत पंढरपूरमध्ये दोघींनी पहिला येण्याचा मान पटकावत जुळे यश संपादन केले होते. दहावीच्या संस्कृत या विषयांमध्ये दोघींनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले होते. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत देखील या दोघीं जुळ्या बहिणींनी केबीपी महाविद्यालयामध्ये प्रथम व द्वितीय येण्याचा विक्रम केला आहे. याशिवाय बारावीला गणित विषयामध्ये देखील दोघींनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.

Riddhi and Siddhi Ropalkar 12th Exam Result
International Competition : नेमबाज साक्षी सूर्यवंशीची 'बुलेट' सुसाट! ऑलिंपिकचे ध्येय, दिल्लीत 'खेलो इंडिया'कडून करणार सराव

रिद्धी व सिद्धी या दोघींनाही आयआयटीमधून अभियांत्रिकी पदवी प्राप्त करावयाची आहे. त्यासाठी आवश्यक असणारी जेईई मेन परीक्षेमध्ये दोघींनी उत्तम यश संपादन केले असून त्या आता जेईई अॅडव्हान्स परीक्षा देणार आहेत. बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल या दोघींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com